Edible Oil : थंडीचा कडाका वाढताच, खाद्यतेलाच्या किंमती भडकल्या..

Edible Oil : थंडीत मागणी वाढली आणि खाद्यतेलाने टेन्शन वाढवलं..

Edible Oil : थंडीचा कडाका वाढताच, खाद्यतेलाच्या किंमती भडकल्या..
तेलाचे दर तापलेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 6:09 PM

नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी (Farmers) विक्री कमी केल्याने शनिवारी दिल्लीसह इंदोर तेल बाजारात खाद्यतेलाच्या किंमती (Edible Oil Price) भडकल्या. थंडीत खाद्यतेलाची मागणी वाढल्याचा परिणामही दिसून आला. त्यामुळे मोहरी, सोयाबीन तेल, कापसाच्या बियाणाचे तेल, सीपीओ आणि पामोलिन तेलाचे भाव तेजीत (Price Hike) होते.

थंडीत पचनासाठी हलक्या तेलाचा वापर वाढतो. ग्राहक अधिक उष्मांक देणारे मोहरी, शेंगदाणा आणि सोयाबीन तेलाचा प्राधान्य देतात. त्यामुळे थंडीची लाट येताच या तेलाची मागणी वाढली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पामोलिन तेल आणि सीपीओचे दर कमी असल्याने त्यांची मागणी वाढली होती. परिणामी त्यांच्या बाजार भावात थोडी वृद्धी झाली. तर आहारासाठी योग्य असल्याने कापासाच्या बियाण्यापासून तयार तेलाची मागणी वाढली. त्यामुळे दरात वृद्धी झाली.

हे सुद्धा वाचा

भारताने खाद्य तेलाची आयात थांबवावी आणि देशातील शेतकऱ्यांचा माल खरेदी करुन त्यांना वाचवावे अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे. गुजरात स्टेट एडिबल ऑईल अँड ऑईलसीड असोसिएशनचे अध्यक्ष समीर शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याविषयीचे पत्र पाठविले आहे.

संघटना यंदा केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराज झाल्या आहेत. यंदा, 2021-22 मध्ये खाद्यतेलाची आयात प्रचंड वाढली आहे. यंदा देशात 1 कोटी 41 लाख टनाहून अधिक खाद्यतेलाची आयात करण्यात आली आहे.

मोहरीच्या तेलाचे भाव 7,300-7,350 रुपये प्रति क्विंटल आहे.

शेंगदाणा तेलाचे दर 6,585-6,645 रुपये प्रति क्विंटल आहे.

शेंगदाणा तेलाचे दर मिल डिलव्हरी 15,100 रुपये प्रति क्विंटल आहे.

रिफांईड शेंगदाणा तेलाचे दर 2,445-2,705 रुपये प्रति टिन आहे.

मोहरी पक्की घानी तेल 2,250-2,380 रुपये प्रति टिन आहे.

तिळाचे तेल 18,900-21,000 रुपये प्रति क्विंटल आहे.

सोयाबीन तेल मिल डिलिव्हरी दिल्ली- 14,200 रुपये प्रति क्विंटल आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.