AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market | शेअर मार्केटच्या 5 गोष्टी, ज्यावर आज दिवसभर लक्ष ठेवायलाच हवं

नवीन वर्षात ओमायक्रॉनचे संकट घोंगावत असले तरी शेअर मार्केटने दमदार सलामी ठोकली आहे. त्यामुळे आज शेअर बाजाराचा कल कोणत्या दिशेला आहे हे गुंतवणूक करण्यापूर्वी बघून घ्या. शेअर मार्केटच्या या 5 गोष्टींवर आज दिवसभर लक्ष ठेवायला हवे. 

Share Market | शेअर मार्केटच्या 5 गोष्टी, ज्यावर आज दिवसभर लक्ष ठेवायलाच हवं
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 11:12 AM

तेजीच्या दिशेने जाणारा शेअर बाजार आज मुहूर्तलाच नकारात्मक नोंद (negative opening in share market today) नोंदवली असली तरी मजबूत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने केली जाणारी कूच हे मळभ लवकरच दूर करु शकते. त्यामुळे दिवसभरात शेअर मार्केटच्या बैलाचा रोख कोणत्या दिशेला असेल आणि त्यावर कोणत्या घटकांचा परिणाम होईल ते बघुयात.

डो जोन्सची घौडदौड

डो जोन्स औद्योगिक सरासरीचा (The Dow Jones Industrial Average) विचार करता हा, या निर्देशकांने रेकॉर्डब्रेक तेजी नोंदवली. हा मुख्य संवेदनशील निर्देशांक आहे. मंगळवारी संपूर्ण दिवस या औद्योगिक आणि आर्थिक निर्देशांक उच्च घौडदौड करुन बंद झाला. त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर दिसून येईल.

आशियातील बाजार

आशियातील शेअर मार्केटमधील शेअर अमेरिकेच्या बाँड उत्पन्नातील दबदब्यापुढे नरमले आहेत. या दबावाचा ताण येथील शेअर बाजारावर दिसून आले. बुधवारी सकाळी तंत्रज्ञानावर आधारीत स्टॉकमध्ये (technology stocks) या दबावापुढे चाचपडतांना दिसून आले. जपानमधील बाजारात 0.1 टक्के वाढ दिसली तर Topix index 0.39 टक्क्यांनी वधरला. दक्षिण कोरीयातील बाजार निर्देशंकाने 1.08 टक्के घसरला.

रोजगार संधींवर ओमायक्रॉनचा प्रभाव

अमेरिकेतील रोजगाराच्या संधीवर ओमायक्रॉनचा परिणाम दिसून आला आहे. मोठ्या प्रमाणावर कामगार त्यांची नोकरी सोडत असून नवीन रोजगाराच्या संध्या कमी झाल्या आहेत. कोविड-19 मुळे रोजगार उपलब्धतीत मोठा खळगा पडला आहे. फेडरल रिझर्व्ह बँक या समस्येवर उपायासाठी सकारात्मक पाऊल टाकत आहे. रोजगारासंबंधी डाटा उपलब्ध झाला असून 2020 मध्ये 15 टक्के लघु आणि कुटीर उद्योगांनी गुडघे टेकविले तर 2021 मध्ये हे प्रमाण 10 टक्के होते. कोविड लाटेचा हा प्रभाव होता.

कच्च्या तेलात उसळी

कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या वर्षाच्या नोव्हेंबरनंतर पहिल्यांदा उसळी दिसून आली. मंगळवारी प्रति बॅलर 80 डॉलर अशी किंमत होती. तेल पुरवठादार संघटना (OPEC) पुरवठ्यात वाढ करण्याची चिन्हे आहेत. ओमायक्रॉनच्या सौम्य प्रभावामुळे संघटनेने हे पाऊल उचलले आहे. अमेरिकेच्या कच्च्या तेलामध्ये 91 टक्के वाढ दर्शवण्यात आली आहे.

वाहन उद्योगात बल्ले बल्ले

वाहन उद्योगात 2020 पेक्षा बुमिंग स्थिती आहे. गेल्या वर्षाची आकडेवारी सकारात्मक आहे. जरी सेमीकंडक्टर आणि चीप उत्पादनात कमालीची कमतरता भासत असली तरी यावर्षीही वाहन बाजारात आशादायी चित्र असेल. चीफ आणि सेमीकंडक्टर उत्पादन करण्यात भारताने घेतलेल्या पुढाकारामुळे वाहन उद्योगात उमेदीचे वातावरण तयार झाले आहे. पण हा उद्योग पूर्वपदावर केव्हा येईल याची अद्यापही शाश्वती दिसून येत नाही. सध्याचा इलेक्ट्रिक वाहन बाजार भविष्यात दुप्पट होण्याची दाट शक्यता आहे.

औषधी कंपन्यांचे घोडे गंगेत

औषधी कंपन्यांची घौडदौड जोरात सुरु आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात भारतीय औषधी उत्पादन कंपन्यांमध्ये 9 ते 11 टक्क्यांची वृद्धी दिसून येऊ शकते. आर्थिक वर्ष 2022 च्या दुस-या तिमाहीत हा वृद्धीदर वाढणार आहे. गुंतवणूक माहिती आणि क्रेडिट दर एजन्सी (ICRA) याविषयीचा अंदाज वर्तविला आहे. दुस-या तिमाहीत 6.4 टक्क्यांची वृद्धी होईल तर पहिल्या तिमाहीत हा वृद्धी दर 16 टक्के महसूल मिळवून देईल अशी आशा आहे.

कामाच्या इतर बातम्या –

फक्त 634 रुपयांमध्ये मिळणार हा LPG सिलिंडर, वजनाला ही हलका, ने-आण करण्यासाठी येणार नाही कुठली ही अडचण

LIC स्वस्तात मस्त पॉलिसी: 28 रुपयांची बचत, 2 लाखांचा लाभ; जाणून घ्या फायदे

कर्ज मंजुरीला ‘सिबिल’चं विघ्न; जाणून घ्या- सिबिल स्कोअर सुधारणेच्या टिप्स

काय सांगता विना इंटरनेट पाठवता येतील पैसे !, एकावेळी 200 रुपये तर एकूण 2000 रुपयांचा करता येईल व्यवहार

कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश.
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल.
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं.