देशात 30 लाखांपेक्षा अधिक ट्रकची चाकं थांबली, संपामुळे महागाईला फोडणी!

Truck Driver Strike | देशातील अनेक राज्यांत ट्रक चालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून आला. काही शहरात पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या. तर भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला महागला. आकड्यांचा विचार करता एकट्या मुंबईतच रोजचा 150 कोटींचा व्यवसाय ठप्प झाला आहे. परिणामी महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे.

देशात 30 लाखांपेक्षा अधिक ट्रकची चाकं थांबली, संपामुळे महागाईला फोडणी!
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 4:24 PM

नवी दिल्ली | 2 डिसेंबर 2024 : चालकांसाठी नवीन नियमांनी देशभरात चक्का जाम केला आहे. नवीन नियमानुसार, जर अपघात झाला आणि ट्रक ड्रायव्हरने घटनास्थळावरुन पोबारा केला तर त्याला 10 वर्षांपर्यंत शिक्षा होईल. सोबतच त्याला जोरदार दंड पण द्यावा लागेल. या नियमाविरोधात देशभरातील अनेक राज्यात ट्रक चालकांनी तीन दिवसांपासून संपाचे हत्यार उपसले आहे. या संपामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. एकट्या मुंबईत 1.20 लाख ट्रक आणि कंटेनर्स दाखल होतात. या संपाचा परिणाम महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगालसह अनेक राज्यात दिसून आला आहे.

देशात 30 लाखांपेक्षा अधिक ट्रकची चाकं थांबली

देशातील ट्रान्सपोर्ट असोसिएशनशी संबंधित लोकांनुसार, देशात जवळपास 95 लाख ट्रक आणि ट्रँकर आहे. त्यामधील 30 लाखांहून अधिक ट्रक आणि ट्रँकरची सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे पूर्ण व्यवस्थाच ठप्प झाली आहे. रस्त्यावर ट्रक, कंटेनर, बस, टँकर उभी करण्यात आली आहे. अर्थात यामध्ये काही संघटनांनी काढता पाय घेतला असला तरी अजून संपाचे रुतलेले चाक मोकळे झालेले नाही.

हे सुद्धा वाचा

तीन दिवसांत 450 कोटींचे नुकसान

एका दिवसाच्या संपामुळे जवळपास 120 ते 150 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. गेल्या तीन दिवसांत 450 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सर्वाधिक फटका पेट्रोल पंप आणि भाजीपाला मार्केटला बसला आहे. संपावर लवकर तोडगा निघाला नाही तर दूधासह दैनंदिन वस्तू महाग होण्याची भीती आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.

संपकऱ्यांचं म्हणणं तरी काय

Hit And Run प्रकरणातील नवीन कायद्याला ट्रक चालकांचा विरोध आहे. जर एखादी व्यक्ती ट्रकला येऊन धडकली. विचित्र अपघात झाला. अशावेळी ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पोबारा केला तर त्याला दहा वर्षांच्या शिक्षेसह जबरी दंडाची तरतूद करण्यात आली आहे. विरुद्ध दिशेने येणारे वाहन अथवा एखादी व्यक्ती अचानक आल्यास अशावेळी चालकाला संधी मिळू शकते. पण अशा प्रकरणात 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. या तरतूदी, नियमाविरोधात चालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या मते, चुकी नसताना त्यांना नाहक अशा प्रकरणात शिक्षा होऊ शकते.

Non Stop LIVE Update
'तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मी म्हातारा झालो नाही...',महायुतीला इशारा
'तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मी म्हातारा झालो नाही...',महायुतीला इशारा.
'लाडक्या बहिणी'ना दम देणं महाडिकांना भोवणार? आयोगानं घेतला मोठा निर्णय
'लाडक्या बहिणी'ना दम देणं महाडिकांना भोवणार? आयोगानं घेतला मोठा निर्णय.
'भाजपवाल्यानो... आता पहिले तुमचीच मस्ती जिरवतो', जानकरांना संताप अनावर
'भाजपवाल्यानो... आता पहिले तुमचीच मस्ती जिरवतो', जानकरांना संताप अनावर.
भाजपच्या जाहीरनाम्यात 'लाडक्या बहिणीं'सह शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा
भाजपच्या जाहीरनाम्यात 'लाडक्या बहिणीं'सह शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा.
'मविआ'चा महाराष्ट्रनामा, जाहीरनाम्यात 'या' पंचसूत्रीसह कोणत्या घोषणा
'मविआ'चा महाराष्ट्रनामा, जाहीरनाम्यात 'या' पंचसूत्रीसह कोणत्या घोषणा.
'माता-भगिनी...', आधी लाडक्या बहिणींना दमदाटी, आता भाजप खासदाराची माफी
'माता-भगिनी...', आधी लाडक्या बहिणींना दमदाटी, आता भाजप खासदाराची माफी.
मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल.
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा.
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?.
सुन लो ओवैसी, कोणाचा बाप पैदा झाला तरी आता.., फडणवीसांचा MIM ला इशारा
सुन लो ओवैसी, कोणाचा बाप पैदा झाला तरी आता.., फडणवीसांचा MIM ला इशारा.