Twitter sold : अखेर ऍलन मस्कनं ट्विटर खरेदी केलंच! तब्बल 44 मिलियन डॉलरमध्ये विकत घेतलं ट्विटर

Twitter Share price : ट्विटरनं ऍलन मस्कला आपली कंपनी विकली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Twitter sold : अखेर ऍलन मस्कनं ट्विटर खरेदी केलंच! तब्बल 44 मिलियन डॉलरमध्ये विकत घेतलं ट्विटर
एलन मस्कImage Credit source: Jnews
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 11:41 AM

नवी दिल्ली : ट्विटरनं ऍलन मस्कला (Elon Musk) आपली कंपनी विकली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऍलन मस्क ट्विटर खरेदी (Twitter Sold) करणार असल्याचा चर्चा रंगल्या होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम लागत ऍलन मस्कनं खरोखरचं ट्विटरची खरेदी केल्याचं स्पष्ट झालं आहे. एएफपी वृत्त संस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. 44 मिलियन डॉलर (44 Million Dollar) इतकी किंमत मोजत ऍलन मस्कनं ट्विटरची खरेदी केली. टेस्लाचे सीहीओ ऍलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासूनच तयारी दाखवली होती. आपले इरादे त्यांनी सुरुवातीच्या काही ट्वीट्समधूनच स्पष्ट केले होते. ऍलन मस्क यांनी डिजिटल माध्यमाच्या व्यवाय क्षेत्रात ट्विटरची खरेदी केल्यानंतर आता या क्षेत्रातील व्यवहार खूप मोठा बदल घटवून आणेल, असा विश्वासही जाणकारांनी व्यक्त केलाय. सुरुवातीला ऍलन मस्क यांना संचालक मंडळावर नेमण्यास ट्विटरच्या संचालकांनी तयारीही दाखवली होती. त्यानंतर ऍलन मस्क ट्विटर खरेदी करणार की काय, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र या चर्चांवर 25 एप्रिलच्या मध्यरात्री पडदा पडला. खरोखरच ऍलन मस्क यांनी 44 मिलियन डॉलर इतकी तगडी रक्कम मोजून ट्विटरची मालकी स्वतःकडे घेतलीय.

थोडक्यात, पण महत्त्वाचं

  1. ऍलन मस्कने ट्वीट कुणाकडून खरेदी केलं?
  2. जॅक डॉरसी या ट्विटरच्या माजी सीईओकडून खरेदी केलं.
  3. जॅक डॉर्सी याने 2006 साली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची स्थापना केली होती.
  4. जॅक डॉर्सी सोबत त्यावेळी त्याचे अन्य तीन साथीदारही या स्थापनेवेळी सोबत होते. नोवा ग्लास, बिझ स्टोन, एवन विलिअम्स अशी त्यांची नावं आहेत.
  5. 25 एप्रिल रोजी ट्विटरच्या संचालक बोर्डासोबत ऍलन मस्कची बैठक झाली. या किती किंमतीत विक्री करायची हा विषय चर्चिला गेला. अखेर 44 मिलियन डॉलर किंमत निश्चित करण्यात आली.

वाचा एएनआयनं काय म्हटलं?

ट्वीटर खरेदीनंतर ऍलन मस्कनं केलेलं पहिल् Tweet :

… 25 मार्चला विचारलेला पोल

ऍलन मस्क यांनी 25 मार्च रोजी ट्विटरवरुनच एक पोल घेतला होता. या पोलमध्ये त्यांनी ट्वीटर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मूल्य जोपासतो की नाही, असा परखड प्रश्न उपस्थित केला होता. या पोलमध्ये तब्बल 20 लाखापेक्षा अधिक लोकांनी मत नोंदवलं होतं. त्यातील 70 टक्क्यापेक्षा अधिक लोकांनी उत्तर नकारार्थी दिलं होतं. यानंतर ऍलन मस्क यांनी लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आता एक नवा प्लॅटफॉर्म गरजेचाय का? असा प्रश्नही महिन्याभरापूर्वी विचारला होता.

अखेर मालकी घेतलीच..

सोशल मीडिया सध्याच्या घडीला महत्त्वाची भूमिका बजावतात. अशावेळी त्यांची मालकी कुणाकडे असते, या मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. फक्त अमेरिकेतच नव्हे तर भारतातही सोशल मीडिया निवडणुकांच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं निरीक्षण अनेक जाणकारांनी नोंदवलेलं आहे. अशातच आता मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर युजर्सवर त्याचा थेट परिणाम दिसून आला, तर नवलही वाटायला नको. ट्विटर सोबतचा व्यवहार येत्या काळात युजर्स सोबत नेमका कसा राहतो हे पाहणं, त्यामुळेच आता महत्त्वाचं ठरणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.