मिळवा 1600 रुपये - सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करतं. यामध्ये शासनाने 1600 रुपये देण्याचं ठरवलं आहे. एलपीजी गॅस कनेक्शन खरेदी केल्यानंतर हे पैसे देण्यात येतील.
LPG cylinder delivery
– यामध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 14.2 किलोग्रॅमचा सिलेंडर किंवा 5 किलोग्रॅमचा सिलेंडर मिळेल. उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ फॉर्म डाऊनलोड करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही LPG सेंटरमधूनही गॅस घेऊ शकता.
ही कागदपत्र आहेत आवश्यक - बीपीएल कार्ड (BPL), बीपीएल (BPL) रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्डची प्रत, एलआयसी पॉलिसी, बँक स्टेटमेंट, नेम प्रिंट आऊट
कोणाला मिळणार योजनेचा लाभ – सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी फक्त महिलाच अप्लाय करू शकतात. यामध्ये अर्जदाराचं वय किमान 18 वर्षे असणं महत्त्वाचं आहे.
अर्जदार कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असलं पाहिजे. कोणत्याही बँकेत अर्जदाराचं खातं असणं आवश्यक आहे. तर अर्जदाराच्या नावावर आधीपासून कोणतंही एलपीजी गॅस कनेक्शन नसावं.
उज्ज्वला योजनेविषयी अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी तुम्ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या Http://www.petroleum.nic.in/sites/default/files/ वेबसाईटला भेट देऊ शकता.