Income Tax : इनकम टॅक्स जैसे थे आहे की खरंच बदललाय? सोप्या शब्दांत समजून घ्या!

Budget 2022 : Income Tax Slab for 2022-23 : अनेकांचं गणित कच्च असतं. संख्या म्हणजे आपल्या शत्रूच आहेत, असंही अनेकांना वाटतं. म्हणून हा किचकट प्रकार उलगडून सांगण्यासाठी आपल्याला दोन वर्ष मागे जावं लागेल.

Income Tax : इनकम टॅक्स जैसे थे आहे की खरंच बदललाय? सोप्या शब्दांत समजून घ्या!
बजेटमध्ये इनकम टॅक्सबाबत झालेली घोषणा नेमकी काय होती?
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 2:46 PM

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेट 2022 (Union Budget 2022) सादर केलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बजेटमध्ये इनकम टॅक्ससाठी काय घोषणा होते, याकडे सगळ्यांची नजर लागली होती. अर्थमंत्र्यांनी (Finance Minister Nirmala Sitaraman) मात्र या अपेक्षांवर पाणी फेरलं. पण तरिही काहींचा मात्र टॅक्स स्लॅबला घेऊन समोर आलेल्या आकड्यांनी घोळ झाला. ओल्ड टॅक्स स्लॅब आणि न्यू टॅक्स स्लॅब यामुळे अनेकांना इनकम टॅक्सबाबत नेमकं काय बजेटमध्ये घडलंय, असा प्रश्न पडणं स्वाभाविकच होतं. त्यामुळे हा प्रश्न सोप्या शब्दांत समजून घेण्याची आवश्यकता आहे. खरंच टॅक्स स्लॅबमध्ये (Income Tax Slab for 2022-23) बदल झाला आहे का? निर्मला सीतारमण यांनी सादर केलेलं बजेट 2022 आणि इनकम टॅक्सवरुन सुरु झालेली चर्चा यांना उधाण आलेलं असतानाच सर्वसामान्यांनी दोन गोष्टी स्वतंत्रपणे समजून घ्यायला हव्यात. यात एक म्हणजे करप्रणालीचे दोन मुलभूत प्रकार समजून घ्यायला हवेत. त्यासोबत तुम्ही-आम्ही आयकर भरताना नेमक्या कोणत्या करप्रणालीचा वापर करत आयकर भरतो, हेदेखील माहीत असणं गरजेचं आहे. चला तर सोप्या शब्दांत या दोन्ही गोष्टी समजून घेऊया आणि हे देखील जाणून घेऊयात की खरंच इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आला आहे की नाही?

दोन गोष्टी समजून घेण्यासाठी 2 वर्ष मागे जावं लागेल..

अनेकांचं गणित कच्च असतं. संख्या म्हणजे आपल्या शत्रूच आहेत, असंही अनेकांना वाटतं. म्हणून हा किचकट प्रकार उलगडून सांगण्यासाठी आपल्याला दोन वर्ष मागे जावं लागेल. ते वर्ष होतं 2020. यात वर्षी निर्मला सीतारमण यांनी एक इंटरेस्टिंग गोष्ट इनकम टॅक्सबाबत केली. 2020 साली सादर केलेल्या बजेटमध्ये निर्मला सीतारमण यांनी दोन करप्रणाली आयकर भरण्यासाठी नव्यानं आणल्या. यावेळी त्यांनी जुनी करप्रणाली होती तशी ठेवली आणि आणखी एक करप्रणाली समोर आणली.

2022-23 या वर्षासाठी कुणासाठी नेमका कसा आहे टॅक्स स्लॅब?

नोकरादार वर्गासाठी येत्या वर्षात असा असेल टॅक्स स्लॅब

ज्येष्ठ नागरिकांसाठी असा असेल टॅक्स स्लॅब

80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असा असेल टॅक्स स्लॅब

काय झिंगाट आहे हे जुनं आणि नवं?

लोकांना आयकर भरताना दोन पर्याय समोर असतात. यातील एक असतो जुना टॅक्स रेजीम आणि दुसरा असतो नवा टॅक्स रेजीम. टॅक्स रेजीम म्हणजेच करप्रणाली. या दोनपैकी एक करप्रणाली ठरवून मगच इनकम टॅक्स फाईल करावा लागतो. दरम्यान, 2020 साली जो नवा पर्याय नव्या करप्रमाणीच्या स्वरुपात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी करदात्यांना दिला होता. या करप्रणालीनुसार लोकांना काही सवलती सोडून कमी रक्कम आयकर म्हणून भरावी लागेल, असं प्रथमदर्शनी दिसून आलं होतं.

मात्र अनेक तज्ज्ञांनी आणि जाणकारांनी केलेल्या अभ्यासानंतर नव्या करप्रणालीपेक्षा जुनीच करप्रणाली ही फायदेशीर असल्याचं सांगितलं जात होतं. जिथे जुन्या कररचनेत पीएफ, मेडिकल इन्श्युरन्स आणि पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास करात सवलत मिळत होती. मात्र नव्या करप्रणालीत अशी सवाल मिळत नाही.

80C ची महत्त्वाची भूमिका

एखादी व्यक्ती कलम 80 सी अंतर्गत केवळ काही बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर किंवा त्यामध्ये सूचीबद्ध विशिष्ट खर्च करण्यासाठी वजावटीचा दावा करू शकते. करदाता जास्तीत जास्त वजावटीचा फायदा उठवण्यासाठी गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकतो. त्यामध्ये वार्षिक 1.5 लाखांपर्यंत ही गुंतवणूक करता येऊ शकते. वर्षभरात करदात्याने करपात्र गुंतवणुकीचा एकत्रित विचार केल्या जातो. त्यानंतर करदाता वजावटीचा दावा करु शकतो. यासंबंधीची सर्व गुंतवणुक पुरावे त्याला सादर करावे लागतात.

कलम 80 सी अंतर्गत करबचतीचे प्रमुख पर्याय काय आहेत?

1. जीवन विमा हप्ता

2. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतील योगदान

3. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि स्वैच्छिक भविष्य निर्वाह निधीमधील योगदान

4. गृहकर्ज

5. घर खरेदीसाठी भरलेले मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क

6. ईएलएसएस अथवा कर बचत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

7. सुकन्या समृद्धी खाते योजनेतील गुंतवणूक

8. मुलांचे शिकवणी शुल्क

9. 5 वर्षांची कर बचत बँक किंवा पोस्टल फिक्स्ड डिपॉझिटमधील गुंतवणूक

10. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणूक

हे सगळ्यात महत्त्वाचंय!

एखाद्या व्यवसायात उत्पन्न घेणारी व्यक्ती आयकर भरत असल्यास तिला एकदाच दोघांपैकी एक करप्रमाणी निवडण्याचा पर्याय मिळतो. एकदा जर का नवी करप्रणाली निवडली, तर त्यानंतर एकदाच फक्त पुन्हा जुन्या करप्रणालीवर स्विच करता येऊ शकेल. पण ही संधी फक्त एकदाच मिळते. त्यामुळे आयकर भरताना प्रत्येकानं आयकर भरताना सर्वच बाबींचा विचार करुन मगच करप्रणाली निवडायला हवी, असा सल्ला जाणकार देतात.

संबंधित बातम्या :

Agriculture Budget 2022 : झिरो बजेट शेती ते किसान ड्रोनच्या वापराला मंजुरी, शेती क्षेत्रासंबधी मोठे निर्णय एका क्लिकवर

Budget 2022| महिलांसाठी तीन नव्या योजना सुरु करणार, 2 लाख अंगणवाड्यांचा दर्जा सुधारणार- अर्थमंत्री

Budget 2022: महागाई महागाई, मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.