Budget 2024 | अंतरिम अर्थसंकल्पात खजिना लुटवणार, निवडणुकीच्या तोंडावर दिलासा मिळणार

Budget 2024 | गेल्यावर्षीच्या म्हणजे 2023 बजेटमध्ये मोदी सरकारने दिलासा दिला होता. गेल्या केंद्रीय बजेटमध्ये टीव्ही, स्मार्टफोन आणि मोबाईल फोनमधील लिथियम आयनच्या बॅटरी सारख्या वस्तू स्वस्त करण्यात आल्या. सिगरेट, आर्टिफिशिअल दागदागिने आणि विमान प्रवास महाग झाला होता.

Budget 2024 | अंतरिम अर्थसंकल्पात खजिना लुटवणार, निवडणुकीच्या तोंडावर दिलासा मिळणार
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 3:13 PM

नवी दिल्ली | 9 जानेवारी 2024 : सर्वसाधारणपणे मार्च महिन्यात बजेट सादर करण्याचा पायंडा होता. अनेक वर्षांचा हा रतीबा मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात खंडीत झाला. मोदी सरकारने 2017 पासून केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा पायंडा सुरु केला. यावर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प मांडतील. अंतरिम बजेट सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. अंतरिम बजेटमध्येच महागाई आणि स्वस्ताई समोर येते. जाणून घेऊयात मोदी सरकारने 2017 पासून काय स्वस्त केले आणि काय केले महाग…

  1. वर्ष 2024 – या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला कर सवलतीसह इतर सवलत मिळू शकते. लोकसभेच्या तोंडावर एखादी योजना सुरु होण्याची शक्यता आहे. महागाईत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. आयात-निर्यातीविषयी धोरण निश्चित होऊ शकते.
  2. वर्ष 2023 मधील बजेट – गेल्यावर्षी म्हणजे वर्ष 2023 मधील बजेटमध्ये मोदी सरकारने टीव्ही, स्मार्टफोन, मोबाईलमधील लिथियम आयन बॅटरीसारख्या वस्तू स्वस्त केल्या होत्या. तर सिगरेट, आर्टिफिशअल दागिने, विमान प्रवास महाग झाला होता.
  3. बजेट 2017 – वर्ष 2017 मधील अर्थसंकल्पात एलईडी लँप, सौर पॅनल, मोबाईलचे सर्किट बोर्ड, मायक्रो एटीएम, फिंगर प्रिंट मशीन, रेल्वे प्रवास, सौर टेम्पर्ड ग्लासची आयात स्वस्त झाली होती. तर चांदीचे शिक्के, सिगरेट, तंबाखू, बिडी, पान मसाला, पार्सल, फिल्टर पाणी महाग झाले होते.
  4. बजेट 2018 – वर्ष 2018 मध्ये मोदी सरकारने कच्चे काजू, सोलर टेम्पर्ड ग्लास स्वस्त केले. कार, मोटारसायकल, मोबाईल, सोने, चांदी, भाजीपाला, फळांचा रस, सूर्यापासून बचावत्मक चष्मे, इत्र, बूट, हिरे, नकील दागदागिने, लॅम्प, हातातील घड्याळ, व्हिडिओ गेम महाग झाले.
  5. हे सुद्धा वाचा
  6. वर्ष 2019 मधील बजेट- 2019 मध्ये मोदी सरकारने सेट टॉप बॉक्स, सुरक्षा उपकरणं, ईव्हीसाठीचे पार्ट्स, कॅमेरा मॉड्यूल, मोबाईल फोन चार्जर स्वस्त केले होते. तर कार, स्प्लिट एसी, सिगरेट, हुक्का, तंबाखू उत्पादने महाग झाली होती.
  7. अर्थसंकल्प 2020 – वर्ष 2020 साखर, स्किम्ड दूध, सोया फायबर, सोया प्रोटीन, वृत्तपत्रांसाठीची कागद आया, दुसऱ्या प्रकारचे कागद स्वस्त झाले. उपचारांसाठीची उपकरणं, बूट, फर्निचर, पंखे, सिगरेट आणि इतर तंबाखू उत्पादनं, मातीची भांडे महाग झाली.
  8. वर्ष 2021 चे बजेट – या अर्थसंकल्पात सोने, चांदी, चामड्याची उत्पादने, नॉयलानची कपडे, लोखंड, स्टील आणि तांब्याची उत्पादनं स्वस्त करण्यात आली. मोबाईल फोन, चार्जर, आयात केलेली रत्ने, किंमती दगड, आयात केलेले एसी, फ्रिज कम्प्रेसर, ऑटो पार्ट्स महाग झाले.
  9. 2022 चे बजेट – वर्ष 2022 च्या अर्थसंकल्पात नकली दागदागिने, संगणक, लॅपटॉप, मोबाईल, पेट्रोलियम संशोधनासाठीची रसायने स्वस्त झाली. चॉकलेट, स्मार्टवॉट, इअरबडसह इतर वस्तू महाग झाल्या.
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.