Budget 2024 | कोणी मांडले देशाचे पहिले बजेट, जाणून घ्या या गोष्टी खास

Union Budget 2024 | स्वातंत्र्यानंतर देशाचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर झाला, तो कोणी सादर केला. त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री कोण होते, याची उत्सुकता अनेकांच्या मनात आहे. पण त्याविषयी त्यांना माहिती नसते. काळानुरुप अर्थसंकल्पात, त्याच्या मांडणीत मोठा बदल झाला आहे. जाणून घ्या पहिल्या अर्थसंकल्पाविषयीची माहिती..

Budget 2024 | कोणी मांडले देशाचे पहिले बजेट, जाणून घ्या या गोष्टी खास
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 11:02 AM

नवी दिल्ली | 10 जानेवारी 2024 : वर्ष 2017 पासून 1 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकार देशाचा अर्थसंकल्प सादर करते. यामध्ये वर्षभराच्या जमाखर्चाची मांडणी असते. अनेक योजनांची माहिती असते. सवलती देण्यात येतात. देशातील जनता त्यांच्या खिशावर काय परिणाम होईल म्हणून केंद्रीय अर्थसंकल्पाकडे डोळे लावून असते. यंदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सहाव्यांदा बजेट सादर करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना खुशखबर मिळण्याची अपेक्षा आहे. पण पहिले बजेट कोणी सादर केले होते, ते माहिती आहे का?

इंग्रजांच्या काळात पहिले बजेट

केंद्रीय बजेट सादर करण्याची परंपरा ब्रिटिश काळात सुरु झाली होती. देशाचे पहिले बजेट इंग्रजांच्या काळात मांडण्यात आले होते. 1860 मध्ये हे पहिले बजेट सादर करण्यात आले होते. त्यानंतर बजेट सादर करण्याच्या या प्रक्रियेत अनेक बदल झाले. देशासाठी एक बजेट सादर करण्याची परंपरा इंग्रजांनी सुरु केली.

हे सुद्धा वाचा

कोणी मांडले पहिले बजेट

आज केंद्रीय अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प मांडतात. पण देशाचा पहिला अर्थसंकल्प ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स विल्सन (James Wilson) यांनी मांडले होते. एप्रिल 1860 मध्ये त्यांनी हे बजेट सादर केले होते. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले बजेट सादर करण्याचा मान आरके शनमुखम चेट्टी (RK Shanmukham Chetty) यांना जातो. 26 नोव्हेबंर 1947 रोजी त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थतज्ज्ञासह चेट्टी हे व्यवसायाने वकीलही होते. खास गोष्ट म्हणजे देशाच्या पहिल्या अर्थसंकल्पात कराचा कोणताही प्रस्ताव नव्हता. यामध्ये 15 ऑगस्ट 1947 ते 31 मार्च 1948 पर्यंतच्या शिफारशी करण्यात आल्या होत्या.

1955 मध्ये पहिल्यांदा हिंदीत सादर करण्यात आले बजेट

स्वतंत्र भारतात इंग्रजांच्या परंपरेनुसार 1955 पर्यंत बजेट केवळ इंग्रजी भाषेतच सादर करण्यात येत होते. 1955-56 मध्ये पहिल्यांदा हिंदीचा वापर करण्यात आला. देशाचे तिसरे अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर सी डी देशमुख (CD Deshmukh) यांनी हिंदी भाषेतून अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सर्वाधिक मेहनत घेतली होती. सीडी देशमुख यांनी ब्रिटिश सरकारने 11 ऑगस्ट, 1943 रोजी आरबीआयच्या गव्हर्नर पदी नियुक्त केले होते. 30 जून, 1949 रोजीपर्यंत ते या पदावर होते.

मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.