Nitin Gadkari : युट्यूबकडूनच लाखोंची कमाई, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विचारच जादूई

Nitin Gadkari : युट्यूबर्सच्या कमाईचे आकडे पाहून आपण हरकून जातो. पण केद्रीय मंत्री नितीन गडकरी हे युट्यूबकडून पण लाखो रुपये महिना कमवितात. द्रष्टे नेते म्हणून आणि प्रयोगशील मंत्री म्हणून ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या या विचारांनी अनेक जण प्रभावित झाले आहेत..

Nitin Gadkari : युट्यूबकडूनच लाखोंची कमाई, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विचारच जादूई
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 3:02 PM

नवी दिल्ली : युट्यूबर्सच्या कमाईचे आकडे पाहून आपण हरकून जातो. पण केद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) हे युट्यूबकडून पण लाखो रुपये महिना कमवितात. द्रष्टे नेते म्हणून आणि प्रयोगशील मंत्री म्हणून ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या या विचारांनी अनेक जण प्रभावित झाले आहेत. युट्यूबवर (Youtube) त्यांचे लाखो फॉलर्स तर आहेतच पण सब्सस्क्राईबर पण आहेत. त्यांच्या विचारांची मोहिनी, अचाट प्रयोग, बोलके आकडे, प्रकल्पाची दिशा हे तर आपण उघड्या डोळ्यांनी दररोज बघत आहोत. युट्यूबवर, अनेक वाहिन्यांवर गडकरी बोलत असले की लोक हातातील कामे सोडून ते ऐकतात. पण ते कोणते व्हिडिओ तयार करतात, कोणत्या व्हिडिओंना सर्वाधिक लाईक्स मिळतात…

किती आहेत सब्सक्राईबर इंडियन इकॉनॉमिक कॉन्क्लेव (IEC) 2023 या कार्यक्रमात गडकरी नुकतेच सहभागी झाले. त्यांनी यावेळी देशातील विविध विकास योजनांची माहिती दिली. युट्यूबपासून ते किती कमाई करतात, याचा खुलासा त्यांनी केला. 2015 साली त्यांनी युट्यूबवर चॅनल सुरु केले. चॅनलवर त्यांचे सर्व भाषण, पत्रकार परिषद आणि मीडियात चर्चेत आलेले वक्तव्याचे व्हिडिओ पोस्ट होतात. त्यांच्या व्हिडिओवर प्रेक्षकांच्या उड्या पडतात. आतापर्यंत 5.27 लाख जणांनी त्यांचे चॅनल सब्सक्राईब केले आहे.

कोणीच नाही परफेक्ट केंद्रीय मंत्र्यांनी कोणीच परफेक्ट नसते अशी टिप्पणी त्यांच्या युट्यूब चॅनल संबंधी केली. त्यांना अनेकदा त्यांच्या चॅनलमध्ये काहीतरी कमी असल्याचे जाणवले आणि ती चूक दुरुस्त करण्याची, सुधारण्याचा प्रयत्न ते करतात. त्यांनी सांगितले की, सिस्टममध्ये, प्रशासनामध्ये पण काही कमी आहे आणि ती भरुन काढण्याची गरज आहे. उत्तम आणि पारदर्शक प्रशासनासाठी आर्थिक लेखाजोखा, लेखा परिक्षण जितके आवश्यक आहे, तेवढेच कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कामगिरीची उजळणी घेणे, परफॉर्मेंस ऑडिट करणे अत्यावश्यक असल्याचे विचार हिरारीने त्यांनी मांडले.

हे सुद्धा वाचा

युट्यूबकडून किती कमाई केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युट्यूबकडून कमाईची माहिती दिली. दरमहा ते युट्यूब चॅनलकडून 4 लाख रुपये कमाई करत असल्याची माहिती त्यांनी उघड केली. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी युट्यूबवर दिलेल्या लेक्चरवर असंख्य चाहते, फॅन्स, प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. त्यांच्या युट्यूब सब्सक्राईबरची संख्या खूप वाढली. त्यांनी कोरोनामुळे घरात बंदिस्त झालो असून काही गंमतीशीर किस्से सांगितले.

950 ऑनलाईन लेक्‍चर्स केंद्रीय मंत्री गडकरी कोरोना काळात सर्वांप्रमाणेच घरात कैद झाले. परंतु, अधिकारी, कर्मचारी आणि जनेतशी ते आधुनिक आयुधांनी जोडलेले होते. यावेळी त्यांनी घरात स्वयंपाक केला. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे लेक्चर घेतले. त्यांनी या काळात 950 ऑनलाईन लेक्‍चर्स घेतले. त्यांनिी परदेशातील विद्यार्थ्यांसाठी लेक्चर घेतले. हे सर्व लेक्चर त्यांनी युट्यूबवर अपलोड केले. ते लोकप्रिय झालेत. आता त्यांना या व्हिडिओच्या माध्यामातून दरमहा 4 लाख रुपयांची रॉयल्‍टी मिळते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.