मतदान ओळखपत्र करायचे अपडेट, मग फॉलो करा की या टीप्स

Voter ID Card | लोकसभा निवडणूक 2024 चा बिगुल वाजला आहे. प्रत्येक राज्यात काही टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी मतदारांची पण लगबग सुरु झाली आहे. काही जण मतदान ओळखपत्रामधील त्रुटी दूर करत आहेत. या सोप्या पद्धतीने ऑनलाईन तुमचे वोटर आयडी कार्ड अपडेट करता येणार आहे.

मतदान ओळखपत्र करायचे अपडेट, मग फॉलो करा की या टीप्स
Voter ID Update
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 3:41 PM

नवी दिल्ली | 20 March 2024 : अनेकदा नोकरी, शिक्षण, लग्न या कारणामुळे आपण एका राज्यात दुसऱ्या राज्यात अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात धाव घेतो. अशावेळी महत्वाच्या कागदपत्रावरुन पत्ता बदलवून घ्यावा लागतो. त्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळे उरला सुरला उत्साहावर पाणी फेरले जाते. दुसऱ्या राज्यात राहायला गेले तर तुमचे मतदान ओळखपत्र अपडेट (Voter ID Card Update) करणे आवश्यक असते. पण नवीन राज्यात, शहरात सरकारी कार्यालयातून काम करणे मोठे जिकरीचे होते. पण मतदान ओळखपत्र आता तुम्हाला घरबसल्या सुद्धा अपडेट करता येते. ही आहे अत्यंत सोपी पद्धत…

असे तपासा तुमचे नाव

सर्वात अगोदर तुमचा फोन वा लॅपटॉपच्या मदतीने https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर जा. याठिकाणी एक नवीन पेज उघडेल. त्याठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील. Search by Details, Search by EPIC and Search by Mobile या आधारे तुम्ही नाव तपासू शकता.

हे सुद्धा वाचा

ही कागदपत्रे आहेत ना जवळ

ही कागदपत्रे तुम्हाला पीडीएफ अथवा जेपीजी फॉर्मेटमध्ये कन्व्हर्ट करुन घ्यावी लागतील. ऑनलाईन प्रक्रियेदरम्यान तुम्हाला ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

  • पासपोर्ट आकाराची 2 फोटो
  • पत्ता विषद करणारी कागदपत्रे
  • बँक पासबुकची कॉपी
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • ITR प्रूफ
  • भाडे करारनामा
  • वीज, पाणी, टेलिफोन, गॅसचे बिल
  • वयाचा दाखला
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड

कसे कराल Voter ID Card अपडेट

  1. सर्वात अगोदर राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर ट www.nvsp.in जा
  2. या ठिकाणी होमपेजवर सर्वात अखेरीस तुम्हाला मतदान ओळखपत्र अपडेट करण्याचा पर्याय मिळेल
  3. त्यावर क्लिक करताच तुमच्यासमोर अर्ज 8 (Form 8) उघडेल
  4. येथे तुमचे नाव, जन्मतारीख, राज्य, विधानसभा मतदार संघ, नवीन स्थानिक पत्ता नोंदवा
  5. पर्यायी माहितीत तुमचा ई-मेल एड्रेस, मोबाईल क्रमांक नोंदवा
  6. त्यानंतर तुमचे छायाचित्र, मुळ आयडी, एड्रेस प्रुफ कागदपत्रे अपलोड करा
  7. आता कॅप्चा नोंदवा आणि डिक्लेरेशन पर्याय भरा
  8. तुम्ही नोंदवलेली माहिती एकदा तपासा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
  9. वोटर आयडी अपडेट करण्यासाठी तुमचा अर्ज आता जमा झाला आहे
  10. तुमचे मतदान ओळखपत्र अपडेट झाल्यानंतर यासंबंधीचा ई-मेल तुम्हाला प्राप्त होईल
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.