राजेहो, अमेरिकेमुळे भारतीय शेअर बाजार बहरला, या एकाच निर्णयाने गुंतवणूकदार झाले की झिंगालाला

US Fed Reserve Rate Cut : अमेरिकन फेडरल बँकेने आतापर्यंतचा मोठा निर्णय घेतला आहे. पॉलिसी रेटमध्ये 50 बेसिस पॉईंट कपातीचा निर्णय घेतला आहे. त्याचा जागतिक बाजारावर थेट परिणाम दिसून आला. हा निर्णय धडकताच भारतीय बाजाराने उसळी घेतली. गुंतवणूकदारांना शंभर हत्तीचे बळ मिळाले.

राजेहो, अमेरिकेमुळे भारतीय शेअर बाजार बहरला, या एकाच निर्णयाने गुंतवणूकदार झाले की झिंगालाला
शेअर बाजार बहरला
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 10:36 AM

अमेरिकेमधील फेडरल रिझर्व्ह बँकेने पॉलिसी रेटमध्ये मोठी कपात केली आहे. त्याचा लागलीच परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. आठवड्याच्या चौथ्या व्यापारी सत्रात गुरूवारी शेअर बाजाराने जबरदस्त उसळी घेतली. दोन्ही निर्देशांकांनी जोरदार घौडदौड नोंदवली. 30 शेअर्सचा मुंबई स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स 500 अंकाहून अधिकने तेजीत आला. सेन्सेक्स आज सकाळच्या सत्रात 83,481.02 अंकावर उघडला. तर रा्ष्ट्रीय सूचकांक निफ्टीने 100 अंकांची मुसंडी मारली. त्यामुळे गुंतवणूकदारांना आज शंभर हत्तीचे बळ आले आहे.

काही मिनिटांतच 700 अंकांची चढाई

भारतीय शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंग सेशनवर या निर्णयाचा परिणाम दिसून आला. बाजार उघडताच पहिल्या 15 मिनिटांत सेन्सेक्स 510 अंकांच्या तेजीसह 83,478 अंकांवर पोहचला. बाजाराचे सत्र 9:15 मिनिटांनी सुरू होताच BSE Sensex 532 अंकांच्या तेजीसह उघडला आणि काही मिनिटातच तो 690.11 अंकांच्या तेजीवर पोहचला. या काळात निफ्टीने पण जोरदार आघाडी घेतली. अवघ्या 5 मिनिटांच्या व्यापारी सत्रात निर्देशांक 199.40 अंक चढून 25,576 अंकावर पोहचला. Bank Nifty या काळात 567 अंकांच्या उसळीसह 53,317.65 अंकांवर व्यापार करत होता.

हे सुद्धा वाचा

अमेरिकेत नवीन व्याज दर लागू

अमेरिकेमधील आर्थिक घडामोडींचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून येतो. आता पण असेच दिसून आले. अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने महागाई आटोक्यात येण्यासाठी मोठी कसरत केली. गेल्या चार वर्षानंतर अमेरिकन फेडरल बँकेने मोठा दिलासा दिला. पॉलिसी रेट्समध्ये 50 बेसिस अंकांची म्हणजे 0.50 टक्के कपात करण्यात आली. त्यामुळे अमेरिकेतील व्याज दर कमी होऊन 4.75 ते 5 टक्क्यांवर आला. यापूर्वी तो दीर्घकाळापासून 5.25 ते 5.5 या दरम्यान होता.

10 शेअरची तुफान तेजी

शेअर बाजारात तुफान तेजीचे सत्र आहे. यामध्ये NTPC चा शेअर सकाळच्या सत्रात 3.03 टक्क्यांनी उसळून 426.40 रुपयांवर पोहचला. तर Wipro Share मध्ये 2 टक्क्यांची उसळी दिसली. Axis Bank आणि TCS चा शेअर 1.50 टक्क्यांनी वधारला. Axis बँकेचा शेअर 1.35 टक्क्यांहून उसळून 1255.10 रुपयांवर पोहचला. तर टीसीएसचा शेअर 1.32 टक्के तेजीसह 4406.35 रुपयांवर पोहचला. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये 1.51 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर 976.95 रुपयांवर पोहचला.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....