Bitcoin ETF : जगभरातील क्रिप्टो गुंतवणूकदारांना लॉटरी, बिटकॉईन ईटीएफ बाजारात दाखल, मिळाली ही मंजूरी

Blackrock Spot bitcoin ETF : अमेरिकन बाजार नियामक SEC ने यावर्षाच्या सुरुवातीला बिटकॉईन ईटीएफला मंजूरी दिली होती. त्यानंतर क्रिप्टोला सुगीचे दिवस आले. आता लवकरच बाजारात गुंतवणूकदारांना कमाईची संधी मिळणार आहे, त्यांचा असा फायदा होणार आहे.

Bitcoin ETF : जगभरातील क्रिप्टो गुंतवणूकदारांना लॉटरी, बिटकॉईन ईटीएफ बाजारात दाखल, मिळाली ही मंजूरी
क्रिप्टो करन्सीला सुगीचे दिवस
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 10:03 AM

क्रिप्टोकरन्सी बाजाराला सुगीचे दिवस आले आहे. या बाजारात सध्या तेजीचे सत्र सुरू आहे. या वर्षाच्या सुरूवातीला अमेरिकन बाजार नियामक SEC ने बिटकॉईन ईटीएफला मंजूरी दिली होती. आता SEC ने ब्लॅकरॉकच्या स्पॉट बिटकॉईन ईटीएफ बाजारात सूचीबद्ध करण्यासास आणि व्यापाराला मंजूरी दिली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आता मालामाल होता येणार आहे. त्यांना या सूचीबद्ध ईटीएफमध्ये ट्रेडिंग करता येईल. कमाई करता येईल.

गेल्या शुक्रवारी देण्यात आली मंजूरी

रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार US SEC ने BlackRock Spot ETF Options ला ट्रेडिंगसाठी शुक्रवारी मंजूरी दिली. ब्लॅकरॉकच्या स्पॉट एक्सचेंज ट्रेडेट फंडच्या लिस्टिंग आणि ट्रेडिंग टेक फोकस्ड इंडेक्स नॅस्डॅकमध्ये होईल. त्यासाठी ब्लॅकरॉकच्या iShares Bitcoin ट्रस्टच्या ऑप्शन्स ट्रेडिंगला IBIT हे चिन्ह देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदारांचा असा होईल फायदा

या मंजुरीमुळे, जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनच्या गुंतवणूकदारांना हेजचा पर्यायी मार्ग सूकर झाला आहे. याचा फायदा संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बिटकॉईन ट्रेडर्स यांना होणार आहे. क्रिप्टोकरन्सीसह बिटकॉईन बाजाराला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे महत्वाचे पाऊल मानण्यात येत आहे. जगभरतील गुंतवणूकदारांसाठी हे महत्वाचे पाऊल आहे, कारण जगभरातील अनेक सरकार क्रिप्टो या अभासी चलनाविरोधात आहेत. भारत सरकारने पण त्याला मान्यता दिली नाही. पण बंदी ही घातली नाही. उलट क्रिप्टोच्या कमाईवर कर लावला आहे.

यावर्षी सर्वकालीन उच्चांक

SEC ने या वर्षाच्या सुरूवातीला पहिल्यांदा बिटकॉईनच्या ईटीएफला मंजूरी दिली होती. बिटकॉईन ईटीएफला मंजूरी मिळाल्याने या बाजारात एकच तेजीचे वादळ आले. गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. बिटकॉईनचे भाव एकदम तेजीत आले. मे महिन्यात किंमतींनी विक्रमी उसळी घेतली. बिटकॉईनसह इतर क्रिप्टोकरन्सीत पण तेजीचे सत्र दिसून आले. क्रिप्टोने उच्चांकी भरारी घेतली होती.

11 Crypto फर्मला मोठा दिलासा

अमेरिकन सिक्युरिटी आणि एक्सचेंज कमिशनने बिटकॉईन ईटीएफसह BlackRock, Ark Investments/21Shares, Fidelity, Invesco, VanEck, आणि इतर 11 अर्जदारांना दिलासा दिला होता. त्यांना बाजारात व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यात गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येईल.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.