Vedanta Demerger : गुंतवणूकदारांचे नशीब उघडले, वेदांता कंपनीचे होणार इतके वाटेहिस्से

Vedanta Demerger : Vedanta Ltd च्या संचालक मंडळाने एकाच समूहातून अनेक कंपन्या स्थापन करण्याचा, डीमर्जरचा निर्णय घेतला आहे. वेदांता लिमिटेड एक, दोन नाही तर इतक्या स्वतंत्र कंपन्या अस्तित्वात आणणार आहे. ही वार्ता धडकताच शेअर बाजारात वेदांताचा शेअर जवळपास 7 टक्क्यांनी उसळला.

Vedanta Demerger : गुंतवणूकदारांचे नशीब उघडले, वेदांता कंपनीचे होणार इतके वाटेहिस्से
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 9:28 AM

नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : वेदांता लिमिटेड (Vedanta Ltd) संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या कंपनीवर संकटांचे काळे ढग जमा झाले होते. गुजरातमध्ये चिप प्रकल्प आकाराला येण्यापूर्वीच Foxconn ने साथ सोडली. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीने चिंता वाढवली आहे. दरम्यान कंपनीच्या संचालक मंडळाच्या एका निर्णयाने कंपनीला उभारी मिळण्याची शक्यता आहे. एकाच समूहातून अनेक कंपन्या स्थापन करण्याचा, डीमर्जरचा (Company Demerger) निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. स्वतंत्र कंपन्यांची वार्ता कळताच शेअर बाजारात वेदांताचा शेअरमध्ये जवळपास 7 टक्क्यांची उसळी आली.

दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर

शेअर बाजाराच्या घसरणीचा फटका कंपनीला पण बसला. कंपनीचा शेअर 238 रुपयांहून थेट 208 रुपयांपर्यंत घसरला होता. या आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी सत्रात हा शेअर जवळपास 7 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 222 रुपयांपर्यंत वाढून बंद झाला. तज्ज्ञांच्या मते, या शेअरमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते.

हे सुद्धा वाचा

Vedanta Ltd च्या डीमर्जरला मंजूरी

BSE संकेतस्थळावरील माहितीनुसार, वेदांता लिमिटेडच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने या कंपनीच्या डीमर्जरला मंजुरी दिली आहे. व्हॅल्यू अनलॉकिंगमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. डीर्मजरनंतर सर्व कंपन्या स्वतंत्र होतील. त्या स्वतंत्र कारभार हाकतील. त्यातील कंपन्या शेअर बाजारात स्वतंत्रपणे सूचीबद्ध होतील. कंपन्यांना स्वतंत्रपणे घौडदौड करता येईल.

इतक्या कंपन्या येणार अस्तित्वात

कंपनीच्या संचालक मंडळाने, वेदांता लिमिटेडचे 6 वाटे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 6 स्वतंत्र कंपन्या अस्तित्वात येतील. या कंपन्यांमुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होईल. गेल्या काही वर्षांपासून वेदांताविषयीच्या घडामोडींमुळे गुंतवणूकदार तळ्यातमळ्यात होते. त्यांना शेअर विकावा की ठेवावा याविषयीचा संभ्रम होता. वेदांता लिमिटेडच्या गुंतवणूकदारांना या पाच कंपन्यांचा प्रत्येकी एक शेअर मिळणार आहे. म्हणजे एका शेअरवर पाच शेअरचा फायदा होईल. जितके अधिक शेअर तेवढा अधिक फायदा होईल.

अशा आहेत नवीन कंपन्या

  • वेदांता ॲल्युमिनियम
  • वेदांता ऑईल अँड गॅस
  • वेदांता पॉवर
  • वेदांता स्टील अँड फेरस मटेरिअल
  • वेदांता बेस मेटल
  • वेदांता लिमिटेड
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.