AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीची 9371 कोटींची संपत्ती बँकांच्या ताब्यात

या तिघांची मिळून 9371कोटी रुपयांची संपत्ती बँकांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आहे. सक्तवसुली संचलनालयाने या तिघांची तब्बल 18 हजार कोटींची मालमत्ता जप्त केली होती. ही रक्कम बँकाच्या बुडित कर्जाच्या 80 टक्के इतकी आहे. | Vijay Mallya, Nirav Modi, Mehul Choksi Assets

मोठी बातमी: विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीची 9371 कोटींची संपत्ती बँकांच्या ताब्यात
विजय माल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 12:50 PM

नवी दिल्ली: भारतीय बँकांना चुना लावून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी (Mehul Choksi) यांना मोठा दणका बसला आहे. या तिघांची मिळून 9371कोटी रुपयांची संपत्ती बँकांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आहे. सक्तवसुली संचलनालयाने या तिघांची तब्बल 18 हजार कोटींची मालमत्ता जप्त केली होती. ही रक्कम बँकाच्या बुडित कर्जाच्या 80 टक्के इतकी आहे. (Vijay Mallya, Nirav Modi, Mehul Choksi’s Assets Worth ₹ 9,371 Crore Transferred To State-Run Banks)

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांनाही परदेशातून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या तिघांनीही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कर्ज म्हणून घेतलेले पैसे आपल्या बेनामी कंपन्यांमध्ये वळवून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला होता. या तिघांनी मिळून बँकांचे 22,585.83 कोटी रुपये बुडवले होते.

मात्र, ‘ईडी’कडून या तिघांच्याही देश-विदेशातील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या एकूण मालमत्तेपैकी 969 कोटींची मालमत्ता ही परदेशात आहे. आतापर्यंत सरकारी बँकांना 8441 कोटी रुपये परत मिळाले आहेत. सध्या विजय माल्ल्या न्यायालयीन लढाईत पूर्णपणे गुंतला आहे. तर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या प्रत्यापर्णाच्या हालचालींना वेग आला आहे.

माल्ल्याकडे वकिलाला द्यायलाही पैसे नाहीत?

विजय माल्ल्या पूर्णपणे कंगाल झाल्याची माहिती आहे. कोर्ट कचेऱ्यांचा फेरा मागे लागल्याने आर्थिक नाकेबंदी झाल्याने मल्ल्याकडे वकिलांना देण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे वेळेत फी नाही दिली तर खटला लढणार नसल्याचा इशारा त्याच्या वकिलाने दिला आहे. त्यामुळे माल्ल्याची डोकेदुखी वाढली आहे. भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून मल्ल्या लंडनला फरार झाला आहे. कधीकाळी पैशांची उधळपट्टी करणाऱ्या मल्ल्याला आता मात्र आर्थिक घरघर लागली आहे. त्याला लंडनमध्ये हजार आणि लाख रुपयांचाही हिशोब ठेवावा लागत आहे. त्याच्या वैयक्तिक खर्चांनाही चाप लागला असून वकिलांना देण्यासाठीही त्याच्याकडे पैसे उरले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

कर्जबुडव्या विजय मल्ल्याला मोठा झटका, ब्रिटिश न्यायालयाने बँकरप्सी याचिका फेटाळली

अनेकांना गंडवणारा मेहुल चोक्सी हनी ट्रॅपमध्ये अडकला? मिस्ट्री गर्लमुळे गूढ वाढलं

Mehul Choksi : ‘भारतातून पळून गेलेलो नाही, उपचारासाठी देश सोडला’, घोटाळेबाज मेहुल चोक्सीचा अजब दावा

(Vijay Mallya, Nirav Modi, Mehul Choksi’s Assets Worth ₹ 9,371 Crore Transferred To State-Run Banks)

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.