Vikas Ecotech Share | एका वडा पावच्या किंमतीत लागणार लॉटरी! खरेदी करा हा शेअर, व्हा मालामाल

Vikas Ecotech Share | एका वडा पावच्या किंमतीत या कंपनीचे 5 शेअर तुम्ही खरेदी करु शकता. सोमवारी या कंपनीला ऑर्डर मिळाल्याचे वृत्त धडकताच, या शेअरला अप्पर सर्किट लागले. या कंपनीला 22.5 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली. चांगले फंडामेंटल असलेले पेनी शेअर लकी ठरतात. ते सुद्धा नशीब उघडतात.

Vikas Ecotech Share | एका वडा पावच्या किंमतीत लागणार लॉटरी! खरेदी करा हा शेअर, व्हा मालामाल
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 9:43 AM

नवी दिल्ली | 12 डिसेंबर 2023 : सोमवारी, विकास ईकोटेक लिमिटेडच्या शेअरला अप्पर सर्किट लागले. तुम्हाला वाटेल हा शेअर खूप महागडा असेल. पण तसे नाही. एका वडा पाव, समोसा अथवा कचोरी यांच्या किंमतीत तुम्हाला या कंपनीचे 5 शेअर खरेदी करता येईल, इतका तो स्वस्त आहे. या शेअरची किंमत अवघी 3.46 रुपये आहे. या कंपनीला 22.5 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याचे वृत्त धडकताच हा शेअर तेजीत आला. कंपनीने नवीन ऑर्डरची माहिती शेअर बाजाराला दिली. पुढील 30-45 दिवसांत ही ऑर्डर पूर्ण करायची आहे. त्याचा फायदा कंपनीला होणार आहे. पेनी शेअरमधील गुंतवणूक जोखीमेची असली तरी चांगला फंडामेंटल असणाऱ्या कंपन्या भविष्यात फलदायी ठरतात.

100 कोटींचा महसूल

Vikas Ecotech कंपनीने या नवीन ऑर्डरच्या जोरावर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 100 कोटी रुपयांचा महसूल जमावला आहे. खासकरुन पॉलिमर उद्योगात कंपनीने जम बसवला आहे. जानेवारी ते मार्च 2024 या काळात कंपनीने निर्यातीवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने ताज्या ऑर्डरसह इतर ऑर्डर झटपट पूर्ण करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

काय करते कंपनी

विकास ही प्लॅस्टिकायझर्समधील नामांकित कंपनी आहे. गेल्या 25 वर्षांपासून कंपनी या क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभी ठाकली आहे. दरवर्षी 12,000 मेट्रिक टन प्लॅस्टिकायझर्सची या कंपनीची क्षमता आहे. दिल्लीत कंपनीचे मुख्यालय आहे. पॉलिमर, रबर, केमिकल कृषी, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, इलेक्ट्रिकल, फूटवेअर, फार्मास्युटिकल्स, ऑटोमोटिव्ह, मेडिकल डिव्हाईस यासह इतर अनेक उत्पादनं तयार करण्याचे काम कंपनी करते.

लवकरच होणार कर्जमुक्त

कंपनीने या ऑगस्ट महिन्यात 101 कोटींचे कर्ज फेडले आहे. आता कंपनीवर कर्जाचा डोंगर नाही. जे थोडेफार कर्ज आहे, ते आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये फेडण्याचा संकल्प कंपनीने केला आहे. त्यामुळे ही कंपनी लवकरच कर्जमुक्त होण्याचा दावा करण्यात येत आहे. बीएसईला कंपनीने तशी माहिती दिली आहे. कंपनीवर सध्या 60 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या आर्थिक वर्षात हे कर्ज फेडण्याची तयारी कंपनी करत आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.