Virat Kohli : क्रिकेटच नाही तर पैसा कमावण्यात पण ‘विराट’ आहे कोहली; या व्यवसायातून करतो बंपर कमाई

Virat Kohli Birthday Special : लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहली याचा आज 5 नोव्हेंबर 2024 रोजी वाढदिवस आहे. तो 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटचे मैदान गाजवणारा कोहली, कमाईत पण विराट आहे. विविध व्यवसायाच्या माध्यमातून तो मोठी कमाई करतो.

Virat Kohli : क्रिकेटच नाही तर पैसा कमावण्यात पण 'विराट' आहे कोहली; या व्यवसायातून करतो बंपर कमाई
हॅपी बर्थ डे विराट Happy Birthday Virat
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 10:55 AM

क्रिकेट विश्वात विराट कोहली हा भारतीय क्रिकेटपटूच एक जग आहे. मैदानात जबरदस्त कामगिरी, समोरच्याला टशन देणारा आणि आपल्या कृतीने प्रेक्षकांचे मन जिंकणारा अशी त्याची ख्याती आहे. तो अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. बॉलिवूड तारका अनुष्का शर्मा सोबत त्याने लग्नगाठ बांधली आहे. विराट हा आलिशान आयुष्य जगतो. आज (5 November) त्याचा 36 वा वाढदिवस आहे. क्रिकेटचे मैदान गाजवणारा कोहली, कमाईत पण विराट (Virat Kohli Birthday) आहे. विविध व्यवसायाच्या माध्यमातून तो मोठी कमाई करतो.

सगळ्यात महागडा क्रिकेटपटू

क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीची कमाई खूप मोठी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI)करारासह कोहलीची वार्षिक कमाई 7 कोटींच्या घरात आहे. स्पोर्ट्सकीडाच्या दाव्यानुसार, कोहली इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो. त्याने 2024 मधील हंगामात 15.25 कोटी रुपये कमावले होते. सोशल मीडिया मार्केटिंग सोल्यूशन प्लेटफ़ॉर्म हॉपर HQ नुसार, त्याची लोकप्रियता अनेक समाज माध्यमावर दिसून आली आहे. प्रत्येक जाहिरातीसाठी तो 11.45 कोटी रुपये आकारत असल्याचा दावा करण्यात येतो. जगभरात सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या टॉप 20 लोकांमध्ये त्याचा समावेश होतो.

हे सुद्धा वाचा

या व्यवसायातून जोरदार कमाई

ब्लू ट्राईब : क्रिकेट व्यतिरिक्त कोहली या व्यवसायातू पण जोरदार कमाई करतो. यामध्ये काही ठिकाणी त्याची पत्नी अनुष्का शर्मा ही पण सोबत आहे. ब्लू ट्राईबमध्ये पण त्याने गुंतवणूक केली आहे.

रेज कॉफी : कोहलीने मार्च 2022 मध्ये या कॉफी ब्रँडमध्ये गुंतवणूक केली होती. कोहली आल्यापासून या कॉपीच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट फायदा विराटला झाला आहे.

One8 : हा एक ॲथेलिटक ब्रँड आहे. या ब्रँडने कम्यून नावाने रेस्टॉरंट ब्रँच उघडल्या आहेत. या ब्रँडची PUMA सोबत भागीदारी आहे. विराट पण या व्यवसायाचा एक हिस्सा आहे.

हायपराईस : कोहलीने या वेलनेस स्टार्ट-अपमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. हा ब्रँड आरोग्यवर्धक औषधांची निर्मिती करतो.

चिसेल फिटनेस : विराट कोहली याने 2015 मध्ये चिसेल फिटनेस लाँच केला होता. यामध्ये भारतभर फिटनेस शाखा सुरू करण्यासाठी त्याने 90 कोटींची गुंतवणूक केली आहे.

डिजिटी इन्शुरन्स : विराटने अनुष्का शर्मा हिच्यासोबत मिळून डिजिट इन्शुरन्स कंपनीत 2.2 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही कंपनी भारतीय विमा क्षेत्रात झपाट्याने आगेकूच करत आहे.

युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिज प्रायव्हेट लिमिटेड : विराटने 2020 मध्ये या फॅशन कंपनीत 19.3 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामध्ये लाईफस्टाईल सेक्टरमध्ये त्याने एंट्री घेतली आहे.

Wrogn : कोहली या फॅशन ब्रँडचा मालक आहे. हा ब्रँड आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) प्रायोजक आहे.

गॅलेक्टस फनवेअर टेक्नॉलॉजी : Kohli ने बेंगळुरू येथील गेमिंग स्टार्ट-अपमध्ये 33.42 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामाध्यमातून त्याची जोरदार कमाई होते.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.