सरकारची 35 लाख कोटींचा कर वसुलीची तयारी, अधिकारी आयकर दात्याला धमकवणार नाही, प्रेमाने करणार हे काम

Vivad Se Vishwas direct tax Scheme: सरकारने 2020 मध्ये 'विवाद से विश्वास' योजनेचा पहिला टप्पा आणला होता.त्यावेळी सुमारे एक लाख करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. सरकारला सुमारे 75,000 कोटी रुपयांचा कर त्या माध्यमातून प्राप्त झाला होता. त्याच्या यशामुळे ही योजना पुन्हा आणली आहे.

सरकारची 35 लाख कोटींचा कर वसुलीची तयारी, अधिकारी आयकर दात्याला धमकवणार नाही, प्रेमाने करणार हे काम
Vivad Se Vishwas direct tax Scheme
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 2:56 PM
Vivad Se Vishwas direct tax Scheme: केंद्र सरकार आयकर दात्यांकडून 35 लाख कोटींचा कर वसुलीची तयारी करत आहे. परंतु त्यासाठी सरकारने एक विशेष योजना आणली आहे. या योजनेस सुरुवात 1 ऑक्टोबरपासून होत आहे. त्याचे परिपत्रक शुक्रवारी काढण्यात आले. कर विवादसंदर्भात असलेल्या या योजनेला ‘विवाद से विश्वास 2.0’ असे नाव देण्यात आहे. प्रलंबित आयकर वादांचे निराकरण करण्यासाठी ही योजना आहे. या योजनेची घोषणा जुलैमध्ये सादर केलेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती.

अर्थसंकल्पात केली होती घोषणा

अर्थ मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की, “केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर 2024 ही तारीख ‘विवाद से विश्वास 2.0’ योजनेसाठी निश्चित केली आहे. सुमारे 35 लाख कोटी रुपयांच्या 2.7 कोटी थेट कर मागण्यांवर विविध कोर्टात वाद सुरू आहेत. त्यामुळे तो वाद सोडवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही योजना अर्थसंकल्पात जाहीर केली होती. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, सरकार कर सुलभ करण्यासाठी, करदात्या सेवा सुधारण्यासाठी, कर निश्चितता प्रदान करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासोबत खटले कमी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवणार आहे.

यापूर्वी आणली होती योजना

सरकारने 2020 मध्ये ‘विवाद से विश्वास’ योजनेचा पहिला टप्पा आणला होता.त्यावेळी सुमारे एक लाख करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. सरकारला सुमारे 75,000 कोटी रुपयांचा कर त्या माध्यमातून प्राप्त झाला होता. त्याच्या यशामुळे ही योजना पुन्हा आणली आहे.

हे सुद्धा वाचा

50 लाख रुपयांपेक्षा मोठी प्रकरणे हवी

कर विवादांशी संबंधित प्रकरणे कमी करण्यासाठी सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात ‘विवाद से विश्वास’ योजना-2 आणली आहे. सरकारने आयकरांच्या प्रकरणांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी ही योजना आणील आहे. अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पातील भाषणानुसार, मूल्यांकन वर्ष संपल्यानंतर, 3 वर्षांपासून ते 5 वर्षांपर्यंतची आयकर संबंधित प्रकरणे पुन्हा उघडली जाऊ शकतात. मात्र हे प्रकरणे 50 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असावी, अशी अट आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.