3 ते 5 वर्षांच्या FD मध्ये गुंतवणूक करायची का? खासगी आणि सरकारी बँकांचे नवे दर काय?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मे 2020 मध्ये कोविड 19 महामारीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी 'SBI WECARE ज्येष्ठ नागरिक' ही विशेष FD योजना सुरू केली होती. ही योजना रिटेल टाइम डिपॉझिट विभागात सुरू करण्यात आली, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या FD वर '5 वर्षे आणि त्याहून अधिक' कालावधीसाठी 30 bps (विद्यमान 50 bps पेक्षा जास्त) अतिरिक्त व्याज दिले जाते.

3 ते 5 वर्षांच्या FD मध्ये गुंतवणूक करायची का? खासगी आणि सरकारी बँकांचे नवे दर काय?
cash
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 4:28 PM

नवी दिल्लीः फिक्स्ड डिपॉझिट (FD) हे गुंतवणूकदारांसाठी सर्वात लोकप्रिय गुंतवणुकीचं साधन आहे. खात्रीशीर परताव्यासह ज्यांना पैशाची सुरक्षितता हवी असते, त्यांच्यासाठी ही योजना उत्तम आहे. मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे आर्थिक उद्दिष्ट ठरवावे लागते, किती वर्षांसाठी किती रक्कम गुंतवायची आहे आधीच निश्चित करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एफडीमध्ये बचत सुरू करावी लागेल. तुम्ही बँकेला भेट देऊन किंवा मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग ऍप्लिकेशन्सद्वारे सहजपणे एफडी खाते उघडू शकता.

बँकांनी दिलेल्या व्याजदरांची तुलना करून पाहा

सामान्य ठेवीदारांच्या तुलनेत बर्‍याच बँका ज्येष्ठ नागरिकांना 0.5 % p.a पर्यंत जास्त व्याजदर देतात. काही प्रकरणांमध्ये ते 0.75% पर्यंत असू शकते. एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही वेगवेगळ्या बँकांनी दिलेल्या व्याजदरांची तुलना करू शकता. म्हणून जर तुम्ही 3-5 वर्षांच्या कालावधीसह FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भारतातील काही आघाडीच्या सार्वजनिक आणि खासगी बँकांद्वारे ऑफर केलेल्या नवीन व्याजदरांची यादी तपासून घ्या.

3-5 वर्षांच्या एफडीवर 4.9 टक्के व्याज

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र हे पहिले नाव आहे, जे 3-5 वर्षांच्या एफडीवर 4.9 टक्के व्याज देत आहेत. बँक ऑफ बडोदाचा व्याजदर 5.25 टक्के आहे. बँक ऑफ इंडिया 3-5 वर्षांच्या एफडीवर 5.05 टक्के व्याज देत आहे. कॅनरा बँक 5.35 टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 5 टक्के, इंडियन बँक 5.25 टक्के, इंडियन ओव्हरसीज बँक 5.2 टक्के, पंजाब नॅशनल बँक 5.25 टक्के, पंजाब अँड सिंध बँक 5.3 टक्के, स्टेट बँक 5.4 टक्के, युको बँक 5.05 टक्के, युनियन बँक 5.4 टक्के , J&K बँक 5.3 टक्के, कर्नाटक बँक 5.4 टक्के आणि कोटक बँक 5.3 टक्के व्याजदर आहे. करूर व्यास बँक 3-5 वर्षांच्या FD वर 5.75 टक्के व्याज देते. RBL बँक 6.3, साउथ इंडियन बँक 5.65, तामिळनाडू मर्कंटाइल बँक 5, TNSC बँक 6 आणि येस बँक 6.25 टक्के व्याजदर देत आहे.

खासगी बँकांचे व्याजदर

अॅक्सिस बँक 5.75 टक्के, बंधन बँक 5.25 टक्के, कॅथोलिक सीरियन बँक 5.5 टक्के, सिटी युनियन बँक 5 टक्के, DCB बँक 5.95 टक्के, धनलक्ष्मी बँक 5.4 टक्के, फेडरल बँक 5.6 टक्के, HDFC बँक 5.3 टक्के, ICICI बँक 5.35 टक्के, IDBI बँक 5.4 टक्के वर्ष FDs, IDFC First Bank 6 टक्के आणि IndusInd Bank 6 टक्के व्याज देत आहे. व्याजदर 25 नोव्हेंबरपर्यंत बँकांच्या वेबसाईटवरून घेतले गेलेत. वार्षिक कमाल व्याजदराचा आकडा दिलाय. हे सर्व व्याजदर सामान्य मुदत ठेवींसाठी आहेत आणि ज्यांची ठेव रक्कम 1 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. यासंबंधित अधिक माहितीसाठी ग्राहक बँक किंवा बँकेच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

SBI ची खास योजना

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मे 2020 मध्ये कोविड 19 महामारीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘SBI WECARE ज्येष्ठ नागरिक’ ही विशेष FD योजना सुरू केली होती. ही योजना रिटेल टाइम डिपॉझिट विभागात सुरू करण्यात आली, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या FD वर ‘5 वर्षे आणि त्याहून अधिक’ कालावधीसाठी 30 bps (विद्यमान 50 bps पेक्षा जास्त) अतिरिक्त व्याज दिले जाते. “SBI Wecare” ठेव योजना 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आलीय.

SBI कडून सर्वसामान्यांसाठी पाच वर्षांच्या FD वर 5.4% व्याजदर

सध्या SBI सर्वसामान्यांसाठी पाच वर्षांच्या FD वर 5.4% व्याजदर देते. एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष FD योजनेअंतर्गत मुदत ठेव ठेवल्यास FD वर लागू होणारा व्याजदर 6.20 टक्के असेल. हे दर 8 जानेवारी 2021 पासून लागू आहेत. तुम्ही ठेव रकमेची मुदतपूर्व पैसे काढण्याची निवड केल्यास अतिरिक्त प्रीमियम भरला जाणार नाही आणि तुम्हाला सुमारे 0.50 टक्के दंड देखील भरावा लागेल.

संबंधित बातम्या

सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित नवा नियम 1 डिसेंबरपासून लागू, पालन न झाल्यास होणार तुरुंगवास

कच्च्या तेलाचे भाव वाढले; पेट्रोल, डिझेल आणखी महागणार?

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.