Weekly Gold Price : सोने महागले तर चांदीत जवळपास हजाराची घसरण, या आठवड्यात कसा राहीला सराफा बाजार

Weekly Gold Price : या आठवड्यात सोने किती महागले चांदीत झाली किती रुपयांची घसरण

Weekly Gold Price : सोने महागले तर चांदीत जवळपास हजाराची घसरण, या आठवड्यात कसा राहीला सराफा बाजार
सोन्या-चांदीत काय झाला बदल?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 4:35 PM

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात (Sarafa Market) या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत वृद्धी दिसून आली, तर चांदीची चमक फिक्की पडली. चांदी स्वस्त झाल्याने गुंतवणूकदारांची चांदी झाली. या व्यापार सप्ताहात सोन्याची किंमत 90 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढली तर चांदीच्या दरात, प्रत्येक किलोमागे 957 रुपयांची घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजे आयबीजीए (IBJA) च्या संकेतस्थळानुसार, या आठवड्याच्या (12 ते 16 डिसेंबर) सुरुवातीला 24 कॅरेट सोन्याचा (Gold) भाव 53,908 रुपये होता. शुक्रवारी हा दर 53,998 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. तर 999 शुद्ध चांदीची (Silver) किंमत किलोमागे 67,022 रुपयांहून 66,065 रुपयांवर घसरली.

IBJA दररोज सकाळी, संध्याकाळी सोन्या-चांदीचा दर घोषीत करते. राष्ट्रीय सुट्टी आणि शनिवार-रविवार वगळता हे भाव जाहीर करण्यात येतात. या भावात नंतर कर आणि घडणावळीचा दर जोडल्या जातो. ग्राहकाला सोने खरेदीनंतर जीएसटीही द्यावा लागतो. ही किंमतही बाजार भावात जोडलेली नसते.

सोन्यात गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारने खास ऑफर आणली आहे. नागरिकांना केंद्र सरकारच्या सुवर्ण रोखे योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme 2022-23)आणली आहे. गोल्ड बाँडच्या विक्रीचा हा तिसरा टप्पा आहे.

हे सुद्धा वाचा

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या माध्यमातून तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करता येते. एक ग्रॅमपासून ग्राहकाला सोने खरेदी करता येते. या बाँडमध्ये रोखीत, डिमांड ड्राफ्ट, नेट बँकिंगच्या मार्फत खरेदी करता येईल. ऑनलाईन खरेदीवर ग्राहकांना सवलतही मिळते.

आरबीआय दोन टप्प्यात सरकारी गोल्ड बाँड स्कीम जारी करणार आहे. या योजनेत डिसेंबर आणि मार्चमध्ये उघडण्यात येईल. अर्थ मंत्रालयानुसार, सरकारी गोल्ड बाँडमध्ये 2022-23, तिसऱ्या टप्प्यात 19 ते 23 डिसेंबर दरम्यान गुंतवणूक करता येईल.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीतील बदल

  • 12 डिसेंबर, 2022- 53,908 रुपये प्रति 10 ग्रॅम 13 डिसेंबर, 2022- 54,030 रुपये प्रति 10 ग्रॅम 14 डिसेंबर, 2022- 54,386 रुपये प्रति 10 ग्रॅम 15 डिसेंबर, 2022- 53,894 रुपये प्रति 10 ग्रॅम 16 डिसेंबर, 2022- 53,998 रुपये प्रति 10 ग्रॅम

गेल्या आठवड्यात चांदीच्या किंमतीतील बदल

  • 12 डिसेंबर, 2022- 67,022 रुपये प्रति किलोग्रॅम 13 डिसेंबर, 2022- 67,161 रुपये प्रति किलोग्रॅम 14 डिसेंबर, 2022- 67,642 रुपये प्रति किलोग्रॅम 15 डिसेंबर, 2022- 66,568 रुपये प्रति किलोग्रॅम 16 डिसेंबर, 2022- 66,065 रुपये प्रति किलोग्रॅम

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.