Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : चांदीचा आलेख उंचावला, सोनेही वधारले, सराफा बाजारात तेजीचे वारे..

Gold Rate : आठवडाभरात चांदीने चांगलीच घौडदौड केली तर सोनेही महागले..

Gold Rate : चांदीचा आलेख उंचावला, सोनेही वधारले, सराफा बाजारात तेजीचे वारे..
चांदीची भरारी, सोने चमकलेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 5:21 PM

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात (Sarafa Bazar) चांदीला लकाकी आली आहे तर सोने ही चमकले आहे. या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Rate) चांगलीच वाढ झाली आहे. त्यात या व्यापारी सप्ताहात सोन्याचे भाव 254 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढले आहेत. तर चांदीच्या किंमतीत 1,387 रुपये प्रति किलोग्रॅम अशी मजबूत वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची (Investors) चांदी झाली. सोन्यातील तेजीचा आलेख स्थिरावल्याचे दिसून आले.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजे आईबीजीए (IBJA)नुसार , या आठवड्यात (21 ते 25 नोव्हेंबर ) सुरुवातीला, 21 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा (Gold) भाव 52,406 रुपये होता. शुक्रवार तो 52,660 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

तर चांदीच्या किंमतीत जोरदार वाढ झाली. चांदीने आठवड्याभरातच हजारचा टप्पा पार केला. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदीच चांदी झाली. 999 शुद्ध चांदीची (Silver) किंमत 60,442 रुपयांहून वाढून 61,829 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

हे सुद्धा वाचा

IBJA च्या संकेतस्थळावर वेगवेगळ्या शुद्धतेचे सोन्याचे प्रमाणित भाव दररोज देण्यात येतात. हे सर्व भाव कर आणि घडणावळीवर (Tax and Making Charges) आधारीत असतात. त्यात देशभरात किंमतीत थोडाबहुत फरक पडतो. या किंमतीत GST चा समावेश नसतो.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत झालेला बदल 21 नोव्हेंबर, 2022- 52,406 रुपये प्रति 10 ग्रॅम 22 नोव्हेंबर, 2022- 52,513 रुपये प्रति 10 ग्रॅम 23 नोव्हेंबर, 2022- 52,418 रुपये प्रति 10 ग्रॅम 24 नोव्हेंबर, 2022- 52,713 रुपये प्रति 10 ग्रॅम 25 नोव्हेंबर, 2022- 52,660 रुपये प्रति 10 ग्रॅम

गेल्या आठवड्यात चांदीच्या किंमतीत झालेला बदल 21 नोव्हेंबर, 2022- 60,442 रुपये प्रति किलोग्रॅम 22 नोव्हेंबर, 2022- 61,551 रुपये प्रति किलोग्रॅम 23 नोव्हेंबर, 2022- 61,700 रुपये प्रति किलोग्रॅम 24 नोव्हेंबर, 2022- 62,266 रुपये प्रति किलोग्रॅम 25 नोव्हेंबर, 2022- 61,829 रुपये प्रति किलोग्रॅम

केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं.
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत.
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी.
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे.
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड..
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड...
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर.
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर.
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू.
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.