Western Railway | भंगारातून पश्चिम रेल्वे मालामाल, इतक्या कोटींची कमाई केली की, तुम्ही म्हणाल भंगार विकले की सोने?

Western Railway | भंगार विक्रीमधून पश्चिम रेल्वेने इतक्या कोटींची कमाई केली की, तुम्ही म्हणाल भंगार विकले की सोने?

Western Railway | भंगारातून पश्चिम रेल्वे मालामाल, इतक्या कोटींची कमाई केली की, तुम्ही म्हणाल भंगार विकले की सोने?
भंगारातून मालामालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 12:37 PM

Western Railway | भंगार विक्रीतून (Scrap Sold) साधारणपणे एखादी संस्था किती कमाई करु शकते? अंदाज तर बांधून पहा. फार फार तर एक कोटी अथवा त्याहून थोडी जास्त रक्कमेचा तुम्ही अंदाज बांधू शकाल. तुम्ही म्हणाल ही रक्कम ही फार सांगितली राव. पण पश्चिम रेल्वेने (Western Railway) भंगार विक्रीतून किती कमाई (Earning) केली हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पश्चिम रेल्वेने सध्या शून्य भंगार मोहिम (Zero Scrap Scheme) सुरु केली आहे. अजगळपणा सोडून परिसर स्वच्छ करण्यावर पश्चिम रेल्वे भर देत आहे. या योजनेतून पश्चिम रेल्वेने गेल्या 6 महिन्यांत तब्बल 150 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. तर भारतीय रेल्वेने 10 ऑगस्ट पर्यंत 200 कोटी रुपये महसूल गोळा केला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (PRO) सुमित ठाकूर यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

भंगारविक्रीचा उपक्रम

पश्चिम रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या 6 महिन्यांत भंगार विक्रीतून 150 कोटीपेक्षा जास्त कमाई झाली आहे. भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम रेल्वे हा चालू वर्षात 6 महिन्यांच्या कालावधीतील 150 कोटीं रुपये महसूल गोळा करणारा पहिला झोन ठरला आहे.पश्चिम रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी पश्चिम रेल्वेने शून्य भंगार मोहीम सुरु केली आहे.

हे सुद्धा वाचा

असा मिळवला महसूल

पश्चिम रेल्वेने सर्व विभागातून चालू वर्षात एप्रिल ते जुलै 2022 दरम्यान, भंगाराच्या विक्रीतून 151.75 कोटी रुपयांच्या महसूलाची नोंद केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या विभागाने भंगार विक्रीतून 88.91 कोटी रुपयांची कमाई केली होती. याची तुलना केली असता, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पश्चिम रेल्वेने 88 टक्के अधिक कमाई केली आहे. या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून 150 कोटी रुपयांचा मोठा टप्पा ओलांडणारा पहिला झोन बनण्याचा मान भारतीय रेल्वेत पश्चिम रेल्वेला मिळाला आहे.

स्वच्छतेचा नारा

भंगाराची विल्हेवाट लावून पश्चिम रेल्वे केवळ महसूलच गोळा करत आहे असे नव्हे तर त्यामुळे रेल्वेचा मोठा परिसर स्वच्छ होणार आहे. तसेच ही जागा दुसऱ्या चांगल्या उपक्रमासाठी ही वापरता येणार आहे. या योजनेमुळे परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे. झिरो स्क्रॅप मिशनचा एक भाग म्हणून,पश्चिम रेल्वेच्या सर्व विभाग आणि विविध डेपोवर भंगारविक्रीचा उपक्रम हाती घेतला जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेने 513.46 कोटी रुपयांचे भंगार विक्री केली आहे.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.