सोन्याची खरेदी करताय, विक्रेता बनावट बिल तर देत नाही ना, खात्री कशी कराल?

Gold | BIS च्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे ज्वेलर्स किंवा किरकोळ विक्रेत्याकडून प्राप्त झालेल्या बिल / इनव्हॉइसमध्ये हॉलमार्क केलेल्या वस्तूंचा तपशील असणे आवश्यक आहे. हॉलमार्क केलेल्या मौल्यवान धातूच्या वस्तूंच्या विक्रीचे बिल किंवा इनव्हॉइसमध्ये प्रत्येक वस्तूचा तपशील, मौल्यवान धातूचे निव्वळ वजन, कॅरेट, शुद्धता आणि हॉलमार्किंग शुल्क नमूद केले पाहिजे.

सोन्याची खरेदी करताय, विक्रेता बनावट बिल तर देत नाही ना, खात्री कशी कराल?
सोने खरेदी
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 12:10 PM

नवी दिल्ली: सध्या खऱ्या अर्थाने सोने खरेदीचा हंगाम सुरू आहे. तुम्हीही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींचा नक्कीच विचार करा. सर्वप्रथम, तुम्ही जे दागिने किंवा सोन्याचे उत्पादन घेत आहात, त्यावरील हॉलमार्किंग नक्कीच तपासा. दुसरी गोष्ट बिलाची. बिल घेण्याचा फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही ते विकायला जाल तेव्हा तुम्ही अनेक त्रासांपासून वाचाल.

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) नुसार, जर तुम्ही किरकोळ विक्रेत्याकडून किंवा ज्वेलर्सकडून हॉलमार्क केलेले दागिने विकत घेत असाल तर त्यांच्याकडून प्रमाणित बिल किंवा इनव्हॉइस घेणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे वाद, गैरवापर किंवा तक्रार निवारणासाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे हॉलमार्क केलेल्या दागिन्यांचे बिल कसे असावे आणि त्यात कोणत्या गोष्टी नमूद करणे आवश्यक आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

BIS चे महत्त्वाचे निर्देश

BIS च्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे ज्वेलर्स किंवा किरकोळ विक्रेत्याकडून प्राप्त झालेल्या बिल / इनव्हॉइसमध्ये हॉलमार्क केलेल्या वस्तूंचा तपशील असणे आवश्यक आहे. हॉलमार्क केलेल्या मौल्यवान धातूच्या वस्तूंच्या विक्रीचे बिल किंवा इनव्हॉइसमध्ये प्रत्येक वस्तूचा तपशील, मौल्यवान धातूचे निव्वळ वजन, कॅरेट, शुद्धता आणि हॉलमार्किंग शुल्क नमूद केले पाहिजे.

अनेक दुकानदार ग्राहकांना कच्ची बिले किंवा तात्पुरती बिलेही देतात. तात्पुरते बिल हे असे असते जे व्यापाऱ्याने एखाद्या वस्तूच्या खरेदीवर ग्राहकाला दिलेले असते जे व्यापार्‍याच्या ऑडिट किंवा लेजरमध्ये दाखवले जात नाही. त्यामुळे तो कर भरणे टाळू शकतो. येथे ग्राहक विविध प्रकारचे कर (आता जीएसटी) भरण्याचेही टाळतो. तात्पुरत्या बिलामध्ये फक्त ज्वेलरी स्टोअरचे नाव (ज्यामधून दागिन्यांचा तुकडा खरेदी केला गेला आहे) आणि तुम्ही खरेदी केलेल्या दागिन्यांची वस्तू दर्शवते. हे सहसा कोऱ्या कागदावर बनवले जाते. अशा व्यवहारातून काळा पैसा निर्माण होतो.

पक्क्या बिलात कोणत्या गोष्टींचा समावेश?

* खरेदी केलेल्या सोन्याची शुद्धता * दागिन्यांचे नाव आणि कोड * तुम्ही किती सोन्यासाठी पैसे देत आहात. तसेच अतिरिक्त शुल्क जसे की मेकिंग आणि वेस्टेज चार्ज. * ज्वेलर्सचा GST ओळख क्रमांक

संबंधित बातम्या:

Petrol Diesel Price: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

तुमचा स्वतःचा QR कोड कसा बनवायचा, व्यापारी आणि दुकानदारांसाठी हा सर्वात सोपा मार्ग

आयकर विभागाची महाराष्ट्रातील ‘या’ बँकेच्या 53.72 कोटींच्या व्यवहारांवर बंदी, तुमचंही खातं नाही ना?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.