ब्लॅक फ्रायडे सेल म्हणजे काय? भारतात ही प्रथा कधी सुरू झाली

आज नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा शुक्रवार आहे, हा शुक्रवार अमेरिका युरोप आणि जगातील अनेक देशांमध्ये ब्लॅक फ्रायडे सेल म्हणून साजरा करण्यात येतो. याची सुरुवात अमेरिकेमध्ये थॅंक्सगिव्हींग डेच्या रुपाने झाली होती.

ब्लॅक फ्रायडे सेल म्हणजे काय? भारतात ही प्रथा कधी सुरू झाली
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 2:35 PM

नवी दिल्ली : आज नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा शुक्रवार आहे, हा शुक्रवार अमेरिका युरोप आणि जगातील अनेक देशांमध्ये ब्लॅक फ्रायडे सेल ( Black Friday Sale) म्हणून साजरा करण्यात येतो. याची सुरुवात अमेरिकेमध्ये थॅंक्सगिव्हींग डेच्या रुपाने झाली होती. असे मानले जाते की, नोव्हेंबरच्या शेवटच्या शुक्रवारपासून ख्रिसमसच्या (Christmas) खरेदीला सुरुवात होते. त्यामुळे ब्लॅक फ्रायडे सेलच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ग्राहकांना खरेदीमध्ये सूट देण्यात येते. या दिवशी ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. जगात सर्वत्र नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा शुक्रवार हा ब्लॅक फ्रायडे सेल म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे.  

     आजपासून ख्रिसमसच्या खरेदीला सुरुवात

आजच्या दिवशी पाश्चात देशांमध्ये ख्रिसमसच्या खरेदीला सुरुवात होते. त्यामुळे तिकडे या दिवसाचे विशेष महत्त्व असते. या दिवशी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येते, तसेच त्याला खरेदी केल्यानंतर गिफ्ट देण्याची देखील प्रथा आहे. या दिवसाची सुरुवात अमेरिकेमध्ये झाली होती. त्यानंतर ही प्रथा युरोपमध्ये पाळण्यात येऊ लागली, आणि आता भारतात देखील हा दिवस साजरा करण्यात येतो, एवढेच नव्हे तर  प्रमुख ऑनलाईन कंपन्यांकडून देखील या दिवशी ग्राहकांना काही खास ऑफर देण्यात येतात.

भारतात कधी आला ब्लॅक फ्रायडे सेल?

ब्लॅक फ्रायडे सेलची सुरुवात अमेरिकेमध्ये 1966 साली झाली. त्यानंतर तो युरोप मार्गे हळूहळू सर्व जगभर पसरला. सर्वत्र हा दिवस थॅक्सगिव्हींग डेच्या रुपात साजरा होऊ लागला. भारतामध्ये  ही प्रथा सुरु व्हायला तसा बराच कालावधी जावा लागला.  भारतामध्ये 2018 साली अमेरिकन ऑनलाईन विक्री कंपनी असलेल्या ईबेने (eBay) ब्लॅक फ्रायडे सेलची प्रथा सुरू केली. 2018 साली नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी या कंपनीकडून आपल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात  खरेदीसाठी ऑफर देण्यात आल्या होत्या. तेव्हापासून भारतामध्ये ब्लॅक फ्रायडे सेल साजरा करण्याची प्रथा पडली.

संबंधित बातम्या 

शेअर बाजारात घसरण; चालू आठवड्यात कोट्यावधीचे नुकसान, आयटी क्षेत्रात गुंतवणुकीचा तज्ज्ञांकडून सल्ला

शेअरबाजारात भूंकप! सेन्सेक्स 1420 अंकांनी कोसळला, गुंतवणुकदाराना कोट्यावधीचा फटका

देशी की विदेशी? परदेशी ब्रँडच्या दारूच्या किंमतीत थेट 36 टक्क्यांनी घट, सरकारची कृपा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.