Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांचा मेगा प्लॅन, डिजिटल फायनान्समध्ये मोठी धमाल

Mukesh Ambani : डिजिटल फायनान्समध्ये लवकरच मोठी उलथापालथ होऊ शकते. या क्षेत्रात आता जिओ फायनान्शिअल कंपनीने पाऊल टाकलं आहे. तीव्र स्पर्धेसोबतच ग्राहकांना मोठा फायदा होईल. काय आहे मुकेश अंबानी यांचा मेगा प्लॅन

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांचा मेगा प्लॅन, डिजिटल फायनान्समध्ये मोठी धमाल
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 8:51 AM

नवी दिल्ली | 08ऑगस्ट 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडपासून (RIL) जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज (JFSL) वेगळी झाली आहे. कंपनी आता बाजारात धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. डिजिटल फायनान्स सेक्टरमध्ये तीव्र स्पर्धा असेल. त्यामाध्यमातून ग्राहकांना मोठ्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील. गेल्या महिन्यात रिलायन्सने त्यांची आर्थिक सेवा कंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेसमेंट लिमिटेड स्वतंत्र केली. तिचे नाव बदलले. ही कंपनी जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेड(JFSL) नावाने बाजारात दाखल झाली आहे.जेएफएसएलचे बाजारातील मूल्य 20 अब्ज डॉलरहून अधिक आहे. त्यामुळे JFSL आता गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील कंपन्या कोल इंडिया आणि इंडियन ऑईलपेक्षा पुढे आहे. तर रतन टाटा (Ratan Tata) यांची टाटा स्टील पण मागे फेकली गेली आहे.

डिजिटल क्रांती

आरआयएलचा इंट्रिगेटेड वार्षिक रिपोर्ट 2022-23 मध्ये अंबानी यांनी या कंपनीचा उद्देश, भविष्यातील वाटचालीचा वृत्तांत दिला. सरळ, किफायतशीर आणि नवीन डिजिटल आयुधांचा वापर करुन ग्राहकांचे समाधान करणे, हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल फायनान्समध्ये भारत वेगाने झेप घेत आहे. डिजिटल क्रांतीची चुणूक जनधन खाते, डिजिटल पेमेंट, स्मार्टफोन यांचा वापर, डेटा यांच्यामाध्यमातून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

भारतीय बाजाराला मिळेल लाभ

आधुनिक तंत्रज्ञानाचा आर्थिक सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी वापर होत आहे. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज पण या तंत्रज्ञानाचा वापर करेल. रिलायन्स, डिजिटिल स्वरुपात आर्थिक सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करेल. आर्थिक क्षेत्रात लोकशाहीचा हा प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला.

शेअरचे मूल्य असे झाले निश्चित

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर 261.85 रुपयांवर निश्चित झाला. या कंपनीचा आयपीओ दोन-तीन महिन्यांनी येईल. प्री-ओपन सत्रात एनएसईवर रिलायन्स शेअरची किंमत 2,580 रुपये प्रति शेअरपर्यंत पोहचली. यापूर्वी एनएसईवर क्लोजिंग प्राईस 2,841.85 रुपये होती. या दोन किंमती आधारभूत धरत 2,841.85—2,580 : 261.85 रुपये अशी शेअरची किंमत आली.

बीएसईवर काय आहे मूल्य

बीएसईवर स्पेशल प्री-ओपन सेशनमध्ये रिलायन्सच्या शेअरची किंमत 2,589 प्रति शेअरवर आली. तर एका दिवसापूर्वी शेअरची क्लोजिंग प्राईस 2,840 रुपये होती. या किंमती आधारभूत धरत बीएसईवर 2,840—2,589 : 251 रुपये अशी शेअरची किंमत निश्चित झाली.

किती आहे भांडवल

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेजच्या शेअरचे एकूण मूल्य 1,66,000 कोटी रुपये म्हणजे जवळपास 20 अब्ज डॉलर इतके आहे. या भांडवलाच्या आधारे JFSL ही भारताची 32 वी मोठी कंपनी ठरली आहे. या कंपनीने पदार्पणातच अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, टाटा स्टील, कोल इंडिया, एचडीएफसी लाईफ, इंडियन ऑईल आणि बजाज ऑटोला मागे टाकले आहे.

पुढील वर्षात गुंतवणूकदार मालामाल

बिझनेस टुडेच्या एका बातमीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअरबद्दल बाजारात भाकीते वर्तविण्यात येत आहे. विविध तज्ज्ञ या शेअरबाबत त्यांचे विचार मांडत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर पुढील वर्षात मार्च महिन्यात 3,000-3100 रुपयांपर्यंत झेप घेईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रिलायन्स रिटेल, जिओ आयपीओ आणि ग्रीन एनर्जीसंदर्भात येत्या काही दिवसांत अनेक खुलासे होतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.