सोने कधी स्वस्त होणार? ग्राहकांच्या चिंतेला मिळाले उत्तर, पैशांची करून ठेवा तयारी

Gold And Silver Price Today : सोने आणि चांदीने सध्या मार्केट गाजवले आहे. दोन्ही धातुनी नवीन रेकॉर्ड नावावर नोंदवला आहे. दिवाळीत सोने 85 हजारांच्या जवळपास तर चांदी 1 लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत असताना, सोने कधी स्वस्त होणार असा मोठा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. काय आहे त्याचे उत्तर?

सोने कधी स्वस्त होणार? ग्राहकांच्या चिंतेला मिळाले उत्तर, पैशांची करून ठेवा तयारी
सोने आणि चांदीचा भाव
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 10:37 AM

सोने आणि चांदीने बाजारात ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. सोने आणि चांदीने सध्या मार्केट गाजवले आहे. दोन्ही धातुनी नवीन रेकॉर्ड नावावर नोंदवला आहे. दिवाळीत सोने 85 हजारांच्या जवळपास तर चांदी 1 लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. सोने गेल्या तीन दिवसांत एक हजारांनी वाढले तर चांदी अखरेच्या टप्प्यात दोन हजार रुपयांनी वधारली. सोने आणि चांदी कधी स्वस्त होणार असा मोठा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. काय आहे त्याचे उत्तर?

सोन्यात स्वस्ताई विसरून जा

सीएनबीसी आवाजने याविषयीचे वृत्त दिले आहे. GJC चे सयंम मेहरा यांच्या मते, इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध पेटले आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे अनेकांचा ओढा वाढला आहे. तर दुसरीकडे दिवाळी तोंडावर असताना वाढलेल्या किंमतींमुळे सोन्याच्या विक्रीत 50 टक्के घसरण झाली आहे. तर धनत्रयोदशीला विक्री वाढण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याच्या भावात कुठलीही घसरण होण्याचा अंदाज नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे.

हे सुद्धा वाचा

केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया यांच्या मते, दिवाळीपर्यंत सोन्यात चढउतार दिसेल. पण सध्या या मौल्यवान धातुत घसरणीचा कोणताही अंदाज नाही. पुढील वर्षात 2025 मधील पहिल्या सहा महिन्यात किंमती 3100 डॉलर प्रति औसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर देशातील बाजारात ही किंमत 85000 रुपये प्रति10 ग्रॅम होण्याची शक्यता आहे. पण त्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरणीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

घसरणीचे कारण काय?

जुने सोने पुन्हा बाजारात येण्याची शक्यता आहे. बाजारात सोन्याची आवक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर गुंतवणुकीसाठी सोने महाग झाल्याने ग्राहक त्याकडे पाठ फिरवू शकतात. त्यामुळे एक उपाय म्हणून किंमतीत कपात होऊ शकते. तर सध्या सुरू असलेले इस्त्रायल-इराण, हमास, हिजुबल्लाह युद्ध आणि रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते. या कारणामुळे सोने स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,410, 23 कॅरेट 77,100, 22 कॅरेट सोने 70,908 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,058 रुपये, 14 कॅरेट सोने 45,285 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 92,283 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.