असाध्य रोगावर जगभरात कुठे पण करा उपचार, रिलायन्सचा हेल्थ इन्शुरन्स आहे ना!
Health Insurance | मुकेश अंबानी यांचा लहान भाऊ अनिल अंबानी यांच्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने नवीन विमा पॉलिसी आणली. तिची सध्या चर्चा सुरु आहे. यामध्ये असाध्य, मोठ्या आजारांवर उपचाराची सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये उपचाराची सुविधा देण्याचा दावा या आरोग्य विमा योजनेत करण्यात आला आहे. इतर काय आहेत वैशिष्ट्ये?
नवी दिल्ली | 17 डिसेंबर 2023 : असाध्य आणि मोठ्या आजारासाठी आरोग्य विमा उपयोगी ठरतो. पण भारतीय नागरिकांना परदेशात गेल्यावर उपचाराची सुविधा मिळण्याची खात्री नव्हती. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने त्यासाठी नवीन विमा पॉलिसी आणली आहे. तिची सध्या बाजारात चर्चा आहे. या पॉलिसीविषयी ग्राहकांची उत्सुकता आहे. अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्सने याविषयीचा आरोग्य विमा पॉलिसी आणली आहे. जगभरात उपचाराची सुविधा देण्याचा दावा या पॉलिसीमध्ये करण्यात आला आहे. आणखी काय आहे या पॉलिसीची वैशिष्ट्ये?
Reliance Health Global
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने भारतीय ग्राहकांसाठी रिलायन्स हेल्थ ग्लोबल पॉलिसी बाजारात उतरवली आहे. त्यामदतीने भारतीयांना जगातिक स्तरावर आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल. ही पॉलिसी भारतीयांना देशातच नाही तर जगभरात कुठेपण आरोग्य विम्याचे संरक्षण देणार आहे. त्यामुळे परदेशात प्रवासासाठी वा इतर कारणासाठी जाणाऱ्या भारतीय नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कॅन्सर आणि बायपास सर्जरीचा खर्च
एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, हा आरोग्य विमा ग्राहकांना कॅन्सर आणि बायपास सर्जरीसारख्या गंभीर आजारात उपचारासाठी मदतीला येईल. केवळ देशातच नाही तर परदेशात पण या गंभीर आजारांवर त्यांना उपचार घेता येईल. याविषयीचा खर्च पॉलिसीत कव्हर होईल.
8.3 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च
रिलायन्स जनरल इन्शुरन्सनुसार, ‘हेल्थ ग्लोबल’ पॉलिसी ग्राहकांना 10 लाख डॉलरपर्यंतचे विमा कव्हर देईल. भारतीय चलनात ही रक्कम 8.30 कोटी रुपये असेल. या विमा रक्कमेसोबतच ग्राहकांना परदेशातील निवास, प्रवास आणि परदेशात व्हिसा संबंधित मदत मिळेल. त्याची तरतूद या पॉलिसीत आहे.
एअर एम्बुलेन्ससह अवयदानपर्यंत
या पॉलिसीअतंर्गत उपचारासाठी खासगी रुम बुक करु शकता. यामध्ये रुमच्या भाडे भरण्याची कोणतीच मर्यादा नाही. ग्राहकांना एअर एम्बुलेन्ससह अवयवदानापर्यंतचा खर्च या पॉलिसीत कव्हर करण्यात आला आहे. कंपनीचे सीईओ राकेश जैन यांनी सांगितले की, भारताने जागतिकस्तरावर आघाडी घेतली आहे. देशातील अनेक नागरीक परदेशात जातात. त्यांच्यासाठी ही पॉलिसी योग्य असेल.