कोण आहेत Noel Tata? ते सांभाळणार टाटा समूहाची जबाबदारी, जे आहेत रतन टाटा यांचे उत्तराधिकारी

Noel Tata Chairman of Tata Trust : रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर नोएल टाटा यांच्या खांद्यावर आता टाटा समूहाची जबाबदारी आहे. 100 देशांमध्ये विस्तारलेल्या टाटा समूहाच्या व्यावसायिक साम्राज्याचे नेतृत्व ते करतील. त्यांची आज टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली. टाटा समूह आज 39 लाख कोटींचा आहे.

कोण आहेत Noel Tata? ते सांभाळणार टाटा समूहाची जबाबदारी, जे आहेत रतन टाटा यांचे उत्तराधिकारी
कोण आहेत नोएल टाटा?
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 4:21 PM

रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर नोएल टाटा यांच्या खाद्यांवर आता टाटा समूहाची जबाबदारी आली आहे. नोएल टाटा, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष आहेत. त्यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झाली. मुंबईत टाटा ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय झाला. सध्या नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. आता त्यांच्या खाद्यावर टाटा ट्रस्टची जबाबदारी आली आहे. 100 देशांमध्ये विस्तारलेल्या टाटा समूहाच्या व्यावसायिक साम्राज्याचे नेतृत्व ते करतील. टाटा समूह आज 39 लाख कोटींचा आहे.

रतन टाटा यांचे चुलत भाऊ नोएल

रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएल टाटा यांच्याशी चर्चा करून शोक संवेदना व्यक्त केल्या. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. या ट्रस्टचे व्यवस्थापन करण्यात त्यांना मुख्य म्हणून पाहिले जाते होते. यापूर्वी तेच नवे अध्यक्ष होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. रतन टाटा यांच्यानंतर आता नोएल टाटा, ट्रस्टच्या होल्डिंग कंपन्यांचे संचलन करतील. नोएल टाटा हे रतन टाटा याचे वडील नवल टाटा आणि सिमोन टाटा यांचे पुत्र आहेत. ते सध्या 67 वर्षांचे आहेत.

हे सुद्धा वाचा

‘नोएल अत्यंत समजूतदार आणि सरळ व्यक्ती’

टाटा सन्सच्या संचालक मंडळाचे माजी सदस्य आर. गोपालकृष्णन यांनी नोएल हा अत्यंत समजूतदार आणि सरळ व्यक्ती असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते आपल्या उद्योग कौशल्याने आणि गुणांनी टाटा समूह अजून नव्या उंचीवर नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नोएल टाटा, 2014 पासून ट्रेंट लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. त्यापूर्वी त्यांनी 2010 ते 2021 पर्यंत टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे नेतृत्व केले आहे.

सांभाळणार आजोबाचा वारसा

टाटा ट्रस्टची स्थापना नोएल आणि रतन टाटा यांचे आजोबा जमशेदजी टाटा यांनी केली केली होती. त्यांनी 1892 मध्ये टाटा समूहाची वीट रचली होती. रतन टाटा यांनी लग्न केले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या उत्तराधिकार्‍याचे नाव सांगितले नाही. नोएल टाटाची नियुक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येते. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्समध्ये 66% हिस्सेदारी आहे. 150 वर्षांहून अधिक वय असलेल्या टाटा ब्रँड अंतर्गत अनेक कंपन्या काम करतात.

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.