कोण आहेत राधा वेम्बू ? देशातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक, संपत्ती 36,000 कोटी
आयआयटी मद्रास मधून इंडस्ट्रीयल मॅनेजमेंट डीग्री घेणाऱ्या राधा वेम्बू देशातील 40 व्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती ठरल्या आहेत.
मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : झोहो कॉर्पोरेशनच्या ( Zoho Corp.) को-फाऊंडर राधा वेम्बू यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांनी श्रीमंतीच्या बाबतीत नायकाच्या ( Nykaa ) संस्थापक आणि सीईओ फाल्गुनी नायर यांना मागे टाकले आहे. 360 वन हेल्थ आणि हुरुन इंडीया यांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासात त्या देशातील 100 श्रीमंत व्यक्तीपैकी 40 व्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती ठरल्या आहेत. 50 वर्षीय राधा वेम्बू यांनी आपल्या भावासह झोहो कॉर्पोरेशनची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.
राधा वेम्बू यांची संपत्ती 36,000 कोटी असून देशातील 100 श्रीमंत व्यक्तीच्या यादीत 40 वा क्रमांक आहे. तर फाल्गुनी नायर या 86 व्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 22,500 कोटी रुपये इतकी आहे. झोहो कॉर्पोरेशनचे सह संस्थापक श्रीधर वेम्बू यांची राधा ही लहान बहिण आहे. श्रीधर वेम्बू यांनी AdventNet मधून 1996 मधून व्यवसायाला सुरुवात केली होती.
राधा वेम्बू यांची झोहो कॉर्प. मध्ये हिस्सेदारी आहे. ही कंपनी क्लाऊडवर बिझनेस सॉफ्टवेअर पुरवठा करते. राधा आणि श्रीधर या बहिण भावाने साल 1996 मध्ये झोहो कंपनीची स्थापना केली होती. श्रीधर यांनी आधी झोहोला एडवेंटनेट नावाने सुरु केले होते.
चेन्नईतून शिक्षण झाले
चेन्नईच्या राहणाऱ्या राधा वेम्बू यांचा जन्म 24 डिसेंबर 1972 रोजी झाला होता. त्यांनी 1997 मध्ये आपले शालेय शिक्षण नॅशनल हायर सेकंडरी स्कूल चेन्नई येथून पूर्ण केले आहे. आयआयटी मद्रासमधून औद्योगिक व्यवस्थापन विषयात डीग्री घेतली. वेम्बू या प्रमुख बहुराष्ट्रीय कंपनी झोहोच्या एक प्रमुख शेअरधारक आहेत.
हुरुन इंडीया रिच लिस्ट 2023
हुरुनच्या मते भारतात गेल्यावर्षी दर तीन आठवड्याला दोन नवीन अब्जपती वाढले आहेत. आता एकूण 259 अब्जपती झाले आहेत. 12 वर्षातील ही वाढ 4.4 पट आहे. देशातील 328 श्रीमंत व्यक्तीसह मुंबई पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर नवी दिल्ली ( 199 ) आणि बंगळुरु ( 100 ) असा क्रमांक लागत आहे. देशात पहिल्यांदा सर्वाज जास्त श्रीमंत असलेल्या 20 शहरांच्या या यादीत तिरुपती या शहराचा क्रमांक लागला आहे.