डाळीच्या ठोक भावात घसरण सुरूच, गेल्या वर्षभरात उडीद डाळीच्या दरात 5 टक्क्यांची घट
गेल्या एक वर्षापासून सातत्याने डाळीच्या भावात (pulses price) घसरण सुरूच आहे. याबाबत शुक्रवारी माहिती देताना केंद्र सरकारने सांगितले की, गेल्या वर्षभरात डाळीच्या ठोक भावात (wholesale prices) सातत्याने घसरण सुरू असून, उडीदाच्या दाळीचे भाव सरासरी 5 टक्क्यांनी कमी झाले आहेत.
मुंबई : गेल्या एक वर्षापासून सातत्याने डाळीच्या भावात (pulses price) घसरण सुरूच आहे. याबाबत शुक्रवारी माहिती देताना केंद्र सरकारने सांगितले की, गेल्या वर्षभरात डाळीच्या ठोक भावात (wholesale prices) सातत्याने घसरण सुरू असून, उडीदाच्या दाळीचे भाव सरासरी 5 टक्क्यांनी कमी झाले आहेत. दरम्यान आता डाळीच्या घसरत असलेल्या दराला स्थिर करण्यासाठी व डाळीचे भाव आणखी कमी होऊ नये यासाठी सरकारकडून (Central Government) आवश्यक ती पाऊले उचलली जात आहे. गेल्या वर्षी मोठ्याप्रमाणात डाळ आयात करण्यात आली होती. त्याचा फटका हा डाळीच्या भावांना बसत असल्याचे दिसून येत आहे. डाळीचे भाव सातत्याने कमी होत असल्याने कडधान्य उत्पादक शेतकरी देखील संकटात साडले आहेत. सातत्याने कमी होत असलेले डाळीचे भाव येणाऱ्या काळात स्थिर करण्याचे उदिष्ट असून, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
उडीद आणि तूर डाळीच्या घाऊक दरात घट
केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार सध्या उडीदाच्या डाळीचा ठोक दर 9,410.58 रुपये प्रति क्विंटल आहे. हाच दर गेल्या वर्षी 25 फेब्रुवारी 2021 रोजी 9,904.39 रुपये प्रति क्विंटल इतका होता. याचाच अर्थ उडीदाच्या दाळीमध्ये गेल्या वर्षभरात 4.99 टक्क्यांची घसरण झाली आहे. दुसरीकडे तुरीच्या डाळीचे दर देखील कमी झाले आहेत. 25 फेब्रुवारी 2021 रोजी तूर डाळीचे भाव 9,529.79 रुपये प्रति क्विंटल होते. चालू वर्षात त्यामध्ये 2.87 टक्क्यांची घट होऊन ते 9,255.88 रुपयांवर पोहोचले आहेत. डाळीच्या किमती कमी होत असल्याने त्या स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
तुरीचे अधिक उत्पादन
गेल्या वर्षाच्या सुरुवातीला डाळीचे दर वाढले होते. दरनियंत्रणासाठी सरकारकडून पाऊले उचलण्यात आली होती. ठोक व्यापाऱ्यांना त्यांच्याकडे शिल्लक असलेला डाळीचा साठा तसेच विक्री झालेल्या डाळीचा साठा सरकारला कळवणे बंधनकारक करण्यात आले होते. त्याचप्रमाणे डाळ आयात करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता. यंदा देशात आणि राज्यात तूरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. परिणामी यंदा डाळीच्या दरात घसरण होत असल्याचे पहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या
IPO मध्ये गुंतवणूक करायचीये? तर मग त्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, वडापाव ते मसाला डोसा; मनपसंत डिश थेट सीटवर