Dividend News : 3 महिन्यात 30 टक्के परतावा, रेल्वे सेक्टरमधील सरकारी कंपनी वाटणार लाभांश

Dividend News : या सरकारी शेअरने कमाल केली. गेल्या तीन महिन्यात 30 टक्के परतावा तर दिलाच, पण कंपनी लवकर लाभांश घोषीत करण्याच्या तयारीत आहे.

Dividend News : 3 महिन्यात 30 टक्के परतावा, रेल्वे सेक्टरमधील सरकारी कंपनी वाटणार लाभांश
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 5:17 PM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे खाते (Railway Department) आता वेग धरु पाहत आहेत. अनेक नव्या दमाच्या ट्रेन देशात वायुगतीने धावणार आहेत. रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. रेल्वे सेक्टरमध्ये मोठे बदल होत आहे. अत्याधुनिक रेल्वे स्टेशनच नाही तर अत्याधुनिक ट्रेन रेल्वेच्या ताफ्यात दाखल होत आहे. त्यामुळे रेल्वेशी संबंधित सर्वच कंपन्यांचे शेअर (Share) सध्या तेजीत आहे. रेल्वेशी संबंधित या सरकारी रेल्वे कंपनीचा शेअरपण जोरदार वधारला आहे. या शेअरने अवघ्या तीन महिन्यांत 30 टक्क्यांची झेप घेतली. तर आत ही कंपनी लवकरच लाभांशाची घोषणा करणार आहे. त्यासाठी कंपनीच्या बोर्डाची बैठक होईल. त्यामुळे गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा मिळणार आहे.

रेलटेलची आगेकूच रेलटेल कॉर्पोरेशनने (RailTel Corporation of India Ltd) ही करामत करुन दाखवली आहे. ही सरकारी कंपनी रेल्वेशी संबंधित अनेक उपक्रमात सहभागी आहे. कंपनीने गेल्या तीन महिन्यांत गुंतवणूकदारांना शेअर बाजारात 30 टक्क्यांचा परतावा दिला. तर एका वर्षांत हा शेअर 42 टक्क्यांनी वधारला. कंपनीला नफा झाला. तो आता गुंतवणूकदारांमध्ये लाभांश रुपात वाटण्यात येणार आहे. त्यासाठी 9 जुलै रोजी बोर्डाची बैठक होईल. त्यात याविषयीचा निर्णय घेण्यात येईल.

नफ्यात मोठी वाढ रेलटेल कॉर्पोरेशनच्या नफ्यात जोरदार वाढ झाली. नफा 54 कोटी रुपयांहून वाढून 76 कोटी रुपये झाला. तर या कंपनीचे उत्पन्न पूर्वी 465.5 कोटी रुपये होते. आता 703.6 कोटी रुपये उत्पन्न झाले आहे. EBITDA 96.4 कोटी रुपयांहून 98.2 कोटी रुपयांवर पोहचला. तर EBITDA मार्जिन 20.7% हून कमी होऊन 14% झाले.

हे सुद्धा वाचा

शेअर असा वधारला शुक्रवारी, 8 जुलै रोजी रेलटेल कॉर्पोरेशनचा शेअर 2.37 टक्क्यांनी वधारला. गुरुवारी बीएसईवर शेअर 130.80 रुपये होता. त्यानंतर तो काल 133.90 रुपयांवर पोहचला. या कंपनीचे बाजार भांडवल 4268.48 कोटी रुपये आहे. तर एका वर्षांत हा शेअर 42 टक्क्यांनी वधारला. या वर्षात हा शेअर 4.77 टक्क्यांनी वाढला. हा स्टॉकचा 52 आठवड्यातील उच्चांक 148.70 रुपये होता. 28 नोव्हेंबर 2022 रोजी हा उच्चांक गाठला. तर 11 जुलै 2022 रोजी हा शेअर 93 रुपयांच्या निच्चांकावर पोहचला. हा 52 आठवड्यातील निच्चांक होता.

निव्वळ नफ्यात वाढ रेलटेलच्या निव्वळ नफ्यात 40 टक्के वाढ झाली. नफा 54 कोटी रुपयांहून वाढून 76 कोटी रुपयांवर पोहचला. मार्च 2023 च्या तिमाहीत ही नफ्याची आकडेवारी समोर आली आहे. कंपनी आता गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करणार आहे. येत्या 9 जुलै रोजी यासंबंधीचा निर्णय होईल.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअरच्या कामगिरीची माहिती आहे. गुंतवणूकदारांनी अभ्यास करुन तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच गुंतवणूक करावी.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.