गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना हटवण्याची का होऊ लागली मागणी, पाहा काय आहे कारण?
Sundar Pichai : सर्वाधिक पगार घेणारे सीईओ म्हणजेच सुंदर पिचई यांची खुर्ची धोक्यात आली आहे. सुंदर पिचाई यांना हटवण्याची मागणी का केली जात आहे. अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पाहा काय आहे कारण.
Google CEO : गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. OpenAI ने नोव्हेंबर 2022 मध्ये ChatGPT रिलीज केले होते तेव्हा Google वर दबाव वाढला होता. त्यानंतर गुगलने एआय चॅटबॉट जेमिनी लाँच केले होते. मात्र त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच सुंदर पिचाई यांच्यावर दबाव वाढला आहे. आता असे मानले जात आहे की ते आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. सुंदर पिचाई हे 2022 मध्ये अमेरिकेत सर्वाधिक पगार घेणारे सीईओ होते. त्यांना 226 दशलक्ष डॉलर्स इतका पगार मिळाला. भारतीय रुपयात ते 18,84,39,13,900 रुपये इतके होतात. म्हणजेच सुंदर पिचाई हे दिवसाला 5 कोटींहून अधिक कमवतात.
का झाली होती टीका
जेमिनीच्या एआय इमेज जनरेशन टूलवर इतकी टीका झाली की त्यांनी नंतर हे फीचर काढून टाकले होते. काही बदल केल्यानंतर ते पुन्हा लॉन्च केले जाईल असे कंपनीने म्हटले होते. सुंदर पिचाई यांनीही चुका मान्य केल्या आहेत. दुसरीकडे गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटच्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे. आता गुगलच्या कल्चरवर ही प्रश्न उपस्थित होत आहेत. कंपनी हाफ-बेक्ड उत्पादने बाजारात आणत असल्याचा आरोप केला जात आहे. याच कारणामुळे कंपनीचे सीईओ पिचाई यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कंपनीच्या विश्वासाला तडा
गुगल चांगल्या उत्पादने बाजारात आणते अशी त्याची ओळख आहे. पण बार्ड आणि आता जेमिनीच्या अपयशाने कंपनीबद्दलच्या या विश्वासाला तडा गेला आहे. एआयच्या शर्यतीत गुगल मागे पडल्याचं म्हटले जात आहे. त्यामुळे Google ला आपल्या संस्कृतीत बदल करण्याची गरज असल्याचं देखील म्हटलं जात आहे. Google ने AI वर प्रभुत्व मिळवायला हवे होते. त्यामुळे पिचाई यांच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जर सुंदर पिचाई आपल्या पदावरून पायउतार झाले तर त्यांना Google चे CEO नियुक्त करावे लागेल. याचे कारण म्हणजे ते अल्फाबेटचे सीईओही आहेत. जेमिनी एआयच्या अपयशामुळे Google पिचाई यांना काढून टाकण्याचा निर्णय घेऊ शकते.