वाढत्या व्याज दराचा फायदा इक्विटी फंडाला मिळणार की डेट म्युच्युअल फंडाला ?

 वाढता व्याज दराचा फायदा इक्विटी फंडाला मिळणार की डेट म्युच्युअल फंडाला? याबद्दल जाणून घेऊया.

वाढत्या व्याज दराचा फायदा इक्विटी फंडाला मिळणार की डेट म्युच्युअल फंडाला ?
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 5:22 PM

 मुंबई :   वाढत्या महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदरात सतत वाढ करत आहेत. भारतातही या वर्षीच्या मे महिन्यापासून व्याज दरात वाढ सुरू आहे. सात डिसेंबर रोजी आरबीआयनं रेपो दरात 35 बेसिस पॉईंटनं वाढवून 6.25%  केले आहे. मे २०२२ पासून आतापर्यंत रेपो दरात 2.25% वाढ करण्यात आली आहे. आता व्याज दरात वाढ होत असताना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची रणनिती कशी असावी?  वाढता व्याज दराचा फायदा इक्विटी फंडाला मिळणार की डेट म्युच्युअल फंडाला? याबद्दल आता जाणून घेऊया.

सुरूवातीला वाढत्या व्याज दराचा डेट म्युच्युअल फंडावर काय परिणाम होतो ?  व्याज दरात वाढ झाल्यानंतर स्थिर उत्पन्न रोखे म्हणजेच फिक्स इनकम सिक्युरिटीजच्या किंमती कमी होतात. त्यामुळे या रोख्यात गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाचा NAV सुद्धा कमी होतो. तर याच्या अगदी विरुद्ध व्याज दर कमी झाल्यास रोख्यात गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाचा NAV वाढतो.

व्याज दरात वाढ होत असल्यानं डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार चिंता वाढली. अशा वेळी डायन्ॅमिक बॉन्ड फंड, लिक्विड फंड, अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड्स, लो ड्युरेशन फंड्स, मनी मार्केट फंड्स आणि शॉर्ट टर्म फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देतात. या फंडानी गेल्या पाच वर्षात सरासरी सहा टक्के परतावा दिलाय.

व्याज दर वाढलेल्या परिस्थितीत डेट फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी डायन्ॅमिक बॉण्ड फंड गुंतवणूकीसाठी सर्वात चांगला पर्याय आहे. गुंतवणूकदारांनी दीर्घकालिन दृष्टीकोन ठेऊन अशा फंडात गुंतवणूक करावी,असा सल्ला क्वांटल म्युच्युअल फंडाचे फिक्स इनकम फंडचे व्यवस्थापक पंकज पाठक यांनी दिला आहे.

व्याज दर वाढलेल्या परिस्थितीत इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी काय करावं ? वाढते व्याज दर हे शेअर बाजारासाठी फारसे चांगले नसतात तसेच मंदी येण्याचीही शक्यता बळावल्यानं बाजारात परताव्याबाबत सांशकता निर्माण करतात,असं आर्थिक सल्लागार म्हणतात.

मात्र, इक्विटी म्युच्युअल फंडात दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी घाबरण्याची गरज नाही. दीर्घकालावधात इक्विटी फंड म्हणजेच लार्ज कॅप, मिड कॅप,व्हॅल्यू फंड्स आणि ELSS ने गेल्या पाच वर्षात 10 टक्के परतावा दिला.

वाढत्या व्याज दराच्या काळात व्हॅल्युएशननुसार व्यवस्थापित करण्यात येत असलेले फंड चांगले असतात. सध्या इक्विटी फंडापेक्षा व्हॅल्यू फंडात गुंतवणूक करणं हा चांगला पर्याय आहे,असा सल्ला क्वाटंम AMC चे इक्विटी फंड मॅनेजर जॉर्ज थॉमस यांनी दिला.

व्हॅल्यू फंड अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करत असतात ज्या कंपनीचा फंडामेंटल्स चांगले असतात मात्र, एखाद्या कारणामुळे सध्या ते अंडरपरफॉर्म करत आहेत आणि दीर्घकालावधीसाठी अशा शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. व्हॅल्यू फंडात गुंतवणूक करणाऱ्यांनी दीर्घकालिन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन गुंतवणूक करावी.

मनी9 चा सल्ला वाढत्या व्याज दराचा परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या म्युच्युअल फंडावर होत असतो.

वाढत्या व्याज दराच्या काळात कोणती रणनितीचा अवलंब करावा त्यामुळे तुमचा फायदा होईल,यासाठी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.

सध्याच्या पोर्टफोलिओमध्ये कोणता बदल करावा किंवा एखादी नवीन गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो हे ठरवा

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.