आली पुन्हा बातमी, पेट्रोलच्या किंमतीत खरंच येईल स्वस्ताई? आता दावा काय

Petrol Price | गेल्या दीड वर्षात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याच्या बातम्या वाचून वाचून तुम्ही पण थकला असाल. कारण या दीड वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताच मोठा बदल झालेला नाही. मे, 2022 मध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती जणू लॉक झाल्या आहेत. या किंमती कमी होण्याची आता पुन्हा ओरड कशामुळे सुरु झाली?

आली पुन्हा बातमी, पेट्रोलच्या किंमतीत खरंच येईल स्वस्ताई? आता दावा काय
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 3:37 PM

नवी दिल्ली | 17 जानेवारी 2024 : केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करणार हे दिवास्वप्नच ठरत आहे. गेल्या दीड वर्षांत जनतेला या बातम्या वाचूनच दिलासा करुन घ्यावा लागत आहे. कारण या दीड वर्षात केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत एक रुपया सुद्धा कमी केलेला नाही. दरवाढ करुन हा निर्णय जणू लॉक करण्यात आला आहे. उलट जागतिक बाजारात क्रूड ऑईल महाग असतानाही देशातील जनतेला कमी किंमतीत इंधन पुरवठा होत असल्याची शाबसकी केंद्राने मिळवली. आता पुन्हा पेट्रोल स्वस्ताईची आवई उठली आहे. त्यामागील कारण तरी काय?

निवडणुका आल्या तोंडावर

मोदी सरकार येण्यापूर्वी काँग्रेसच्या काळात इंधन किंमतीत वाढ झाल्यावर तत्कालीन विरोधी पक्ष आणि आताच्या सत्ताधाऱ्यांनी देश डोक्यावर घेतला होता. पण भाजप सत्तेत आल्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याऐवजी त्यांनी सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. जनतेने मोठा रोष व्यक्त केल्यानंतर गेल्या दीड वर्षांत इंधनाचे भाव स्थिर आहेत. एकदाच हे भाव उच्चांकावर पोहचल्यावर जणू ते लॉक करण्यात आले आहेत. आता लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने पेट्रोलमध्ये 10 रुपये स्वस्ताईचा दावा करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा
  • कंपन्यांना सहा महिन्यांत 4,917 टक्क्यांचा नफा
  • एप्रिल 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल नाही
  • मे 2022 मध्ये केंद्र सरकारने इतर कर तर राज्यांनी व्हॅट केला होता कमी
  • OMCG ला आर्थिक वर्ष 2023-24 मधील पहिल्या सहामाहीत बक्कळ निवळ नफा
  • आर्थिक वर्ष 2022-23 शी तुलना करता हा नफा 4,917 टक्के अधिक आहे
  • तज्ज्ञांच्या मते नफ्याचे हे गणित 75 हजार कोटी रुपयांच्या घरात
  • या तिमाहीत तीनही कंपन्यांना एकत्रित 57,542.78 कोटी रुपयांचा नफा

10 रुपयांपर्यंत होईल स्वस्त

एचटीच्या एका वृत्तानुसार, सरकारी पेट्रोलियम कंपन्यांना या पूर्वी मोठा तोटा सहन करावा लागला होता. केंद्र सरकारने त्यांना काही हजार कोटींचे अनुदान दिले होते. त्यानंतर या कंपन्या आता फायद्यात आहेत. त्यांनी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत नफा कमावला. जागतिक बाजारात पण कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेल दहा रुपयांनी स्वस्त होण्याचा दावा करण्यात येत आहे. आता दाव्यानुसार दिलासा मिळेल की पुन्हा ही एक अफवा असेल हे लवकरच समोर येईल.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.