Share Market : शेअर बाजार तोंडावर आपटणार? परदेशी गुंतवणूकदारांनी असं केलं तरी का

Share Market : शेअर बाजारात येत्या काही दिवसात खरंच आपटी बार होईल का? परदेशी गुंतवणूकदारांच्या या कृतीमुळे बाजारात सध्या वेगळंच वारं वाहत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात बाजाराचा मूड काय असेल?

Share Market : शेअर बाजार तोंडावर आपटणार? परदेशी गुंतवणूकदारांनी असं केलं तरी का
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 5:27 PM

नवी दिल्ली | 06 ऑगस्ट 2023 : येत्या दिवसात शेअर बाजारात (Share Market) मोठी घसरण होणार आहे का? अशी शंका सातत्याने विचारल्या जात आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या कित्येक दिवसापासून भारतीय शेअर बाजारावर फिदा आहेत. गेल्या ​5 महिन्यापर्यंत त्यांनी गुंतवणूकीचा धडाका लावला. पण आता परदेशी गुंतवणूकदारांनी अचानक पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. ब्लॅक वेन्सडेनंतर हा प्रकार तर प्रकर्षाने समोर आला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी (Foreign Investors) भारतीय बाजारात विक्रीचे सत्र सुरु केले आहे. या काळात परदेशी पाहुण्यांनी जवळपास 2000 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. नफा कमाविण्यासाठी ही विक्री होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

विक्रीचे सत्र सुरु राहणार

जियोजित फायनेन्शिअलचे व्ही. के. विजयकुमार यांनी याविषयीचे मत मांडले. त्यानुसार, अमेरिकेत 10 वर्षांच्या बाँडमध्ये चार टक्क्यांहून अधिकचा वृद्धीदर मिळण्याची आशंका फोल ठरेल. येत्या काही काळात हा परतावा कमी होऊ शकतो. पण बाँडमध्ये अधिकचा परतावा मिळाला तर कदाचित परदेशी पाहुणे भारतीय बाजारातून पैसे काढतील. अथवा कमी गुंतवणूक करतील.

हे सुद्धा वाचा

या आठवड्यातील आकडेवारी

शेअर बाजारातील आकड्यानुसार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 1-5 ऑगस्ट या दरम्यान 2,034 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या पाच महिन्यात भारतीय बाजारात सातत्याने गुंतवणूक केली. पण आता त्यांचा मूड बदलला आहे. त्याचा भारतीय बाजारावर परिणाम दिसू शकतो.

40 हजार कोटींहून अधिकची गुंतवणूक

FII ने मे, जून आणि जुलै या तीन महिन्यात सरासरी 40,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक केली. आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात या पाहुण्यांनी 46,618 कोटी रुपये, जून महिन्यात 47,148 कोटी रुपये आणि मे महिन्यात 43,838 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी 34,626 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.

झटपट रक्कम खात्यात

यावर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, 27 जानेवारी, 2023 रोजी T+1 सेटलमेंटचा (T+1 Settlement) निर्णय लागू करण्यात आला होता. त्यामुळे शेअर विक्री केल्यानंतर एका दिवसांत पैसा खात्यात जमा होत होता. आता त्यापेक्षा झटपट रक्कम खात्यात जमा होणार आहे. आता सत्र संपतानाच ग्राहकाच्या खात्यात रक्कम येऊन पडू शकते. त्यासाठी सेबीने पुन्हा एकदा पाऊलं टाकलं आहे. येत्या 1 ऑक्टोबर 2023 रोजी पासून हा नियम लागू होईल. आता हा नियम जवळपास सर्वच ट्रेडसाठी लागू होईल. असा करणारा भारत हा मोजक्याच प्रतिनिधित्व करणाऱ्या देशांपैकी एक होईल.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.