Credit and Finance for MSME | लघु उद्योजकांच्या स्वप्नांना पंख! सहज मिळेल कर्ज, सिडबीचा मास्टर प्लॅन माहिती आहे का?

Credit and Finance for MSME | छोट्या उद्योगांना लवकरच कर्ज मिळणे सोपे होणार आहे, सिडीबीचा मास्टर प्लॅन माहिती आहे का?

Credit and Finance for MSME | लघु उद्योजकांच्या स्वप्नांना पंख! सहज मिळेल कर्ज, सिडबीचा मास्टर प्लॅन माहिती आहे का?
लघु उद्योजकांना नवीन संधीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 7:20 AM

Credit and Finance for MSME | छोट्या व्यावसायिकांसाठी, लघु उद्योजकांसाठी सकाळी सकाळीच ही आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. त्यांना कर्ज मिळण्यातील अडचणी आता चुटकीसरशी सूटणार आहे. कर्ज मिळणे लवकरच सोपे होणार आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) ही एमएसएमई क्षेत्रातील प्रमुख वित्तीय संस्था एमएसएमईसाठी नवीन क्रेडिट रिस्क रँकिंग सुरू करणार आहे. सिडबीच्या या मास्टर प्लॅनमुळे छोट्या उद्योजकांच्या स्वप्नांना पंख लागणार आहे. यामुळे बँकांना छोट्या उद्योगांना कर्ज देण्यासाठी जलद निर्णय घेता येतील. क्रेडिट इन्फर्मेशन कंपनी ट्रान्सयुनियन सिबिल आणि ऑनलाइन पीएसबी लोन्स (OPL) यांनी संयुक्तपणे एमएसएमईसाठी डिजिटल कर्ज देणारी नवीन प्रणाली विकसीत केली आहे. त्यामाध्यमातून MSMEsशी संबंधित क्रेडिट जोखमीसाठी योग्य स्कोअर देईल. सध्या सिडबीच्या 400 ग्राहकांसह त्याची चाचणी घेण्यात येत असून, ती आणखी 600 ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची बँकेची योजना आहे.

असा असेल फिट स्कोअर

नवीन रेटिंग तयार करण्यासाठी जीएसटी डेटा, आयटीआर रिटर्न आणि चालू बँक खाते यांची माहिती जमा करण्यात येईल असे सिडबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हा तपशील कंपनीच्या परतफेडीच्या डेटाशी जुळविला जाईल आणि फिट स्कोअरचे मानक वर्गीकरण करण्यात येईल. उदाहरणार्थ, ज्या कंपन्यांचा जीएसटी रेकॉर्ड अस्थिर आहे आणि उत्पन्नातील चढ-उतारांमुळे कर्जफेड होण्याची अपेक्षा आहे, त्यांचा फिट स्कोअर खराब असेल. या आधारे एमएसएमईसाठी मानक श्रेणी तयार करण्यात येईल. त्यामुळे बँकांकडे अर्ज केलेल्या लघु उद्योजकांना कर्ज प्रकरणावर प्रक्रिया करणे सुलभ होणार आहे. या रेटिंगचा त्यासाठी उपयोग होईल.

हे सुद्धा वाचा

बँकांच्या भूमिकेवर लक्ष

एमएसएमई असोसिएशन चेंबर ऑफ इंडियन मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायझेसचे (CIMSME) अध्यक्ष मोहन गुप्ता यांच्या मते बँका हे धोरण कशा प्रकारे स्वीकारतात यावर नव्या क्रमवारीचे यश अवलंबून असेल. याशिवाय सध्या एमएसएमई रेटिंग्स (MSME Ratings) आहेत, पण कर्ज अर्जाबाबत निर्णय घेण्यासाठी बँकांना त्यांच्या अंतर्गत रेटिंग पद्धती किंवा बँक लोन रेटिंग्ज (BSR) वर अवलंबून राहावे लागते. सिबिलकडे छोट्या व्यवसायांसाठी क्रेडिट स्कोअर देखील आहे. सिबिल एमएसएमई रँक (CMR) ज्याचे मूल्य 1 ते 10 दरम्यान आहे. त्याआधारे कर्ज वितरणाची प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. सीएमआर-1 ते सीएमआर-3 हे मानांकन कमी जोखमीचे मानले जाते तर सीएमआर-7 ते सीएमआर-10 हे प्रमाण अधिक जोखमीचे मानले जाते. माजी एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी एमएसएमईसाठी रेटिंग सिस्टम तयार करण्याची घोषणा केली होती, परंतु गेल्या वर्षी जुलै 2021 मध्ये, विद्यमान एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी सरकारची अद्याप अशी कोणतीही योजना नसल्याची माहिती संसदेत दिली आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.