Multibagger Stock : स्कूटर ऐवजी बाबांनी खरेदी केला असता हा शेअर तर लागली असती लॉटरी; आज तुमच्याकडे असते 952 कोटी
Wipro Super Multibagger Stock : आता तुम्ही म्हणालं, बाबाचं काय चुकलं? बाबांनी गुंतवणूक करताना या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती तर तुम्हाला आज 952 कोटी रुपयांची लॉटरी लागली असती, या कंपनीने मालामाल केले असते. बाजारातील ही वार्ता वाचली का?
अनेकांच्या ध्यानीमनी आजही शेअर बाजार हा जुगारच असल्याचे स्पष्ट होते. काहींना एका झटक्यात श्रीमंत व्हायचे असते. बाजारात हौसे-नवसे-गवसे सगळेच आहेत. कंपन्यांचा योग्य अभ्यास, धोरण, दीर्घकालीन गुंतवणूक याबाबतीत जे गुंतवणूकदार सजग असतात. त्यांना काहींना काही फायदा होतो. तर या शेअरने पण असाच चमत्कार केला आहे. हा शेअर 1980 च्या दशकात बाजारात आला होता. आज या शेअरने गुंतवणूकदारांना इतका परतावा दिला आहे की, त्याच्या सात पिढ्या बसून खातील. त्याकाळी बजाज स्कूटरची किंमत जवळपास 10 हजार रुपये होती. त्यावेळी बाबांनी ही स्कूटर न खरेदी करता, हा शेअर खरेदी केला असता तर आज पुढच्या पिढीकडे एखादा मोठा उद्योग उभारण्याइतका पैसा जमा झाला असता.
कोणता आहे हा स्टॉक
तर हा स्टॉक आहे दिग्गज आयटी कंपनी विप्रोचा (Wipro). या कंपनीच्या शेअरची वर्ष 1980 मध्ये 100 रुपये किंमत होती. अर्थात 10 हजार रुपयांच्या स्कूटरच्या किंमतीत त्यावेळी केवळ 100 शेअर आले असते. तोपर्यंत विप्रो कंपनी ही शेअर बाजारात सूचीबद्ध झाली नव्हती. या कंपनीचा आयपीओ 1946 मध्येच आला होता. त्यावेळी भारतीय शेअर बाजार इतका मोठा सुद्धा नव्हता. त्याचे अस्तित्व मर्यादीत होते. स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाल्यानंतर 8 नोव्हेंबर 1995 रोजी विप्रो बाजारात सूचीबद्ध झाली.
बाजारात दाखल होताच झाली घसरण
बाजारात दाखल झाल्यावर विप्रोने प्रति शेअरची किंमत कमी केली. सूचीबद्ध होताना या शेअरचा भाव अवघा 10 रुपये प्रति शेअर होता. कंपनीने त्यानंतर अनेकदा शेअर स्प्लिट केला. त्यामुळे 1980 मध्ये खरेदी केलेल्या 100 शेअरची मूल्य वाढले. 1.92 कोटी शेअरच्या घरात पोहचले.
आज कितीचा असता शेअर
शेयर बाजारमध्ये 14 ऑगस्ट रोजी विप्रोचा स्टॉक 495.70 रुपयांवर बंद झाला होता. त्याप्रमाणे 1.92 कोटी शेअरची एकूण किंमत आज 952 कोटी रुपये झाली असती. 1980 साली वडिलांनी दहा हजारांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची किंमत 952 कोटी रुपये झाली असती. इतक्या रुपयात तर एखादी व्यक्ती उद्योजक झाली असती. या कालावधीत विप्रोने वार्षिक सरासरी जवळपास 40 टक्क्यांचा रिटर्न दिला.
भविष्यातील टार्गेट प्राईस तरी किती?
Wipro कंपनीने गेल्या 10 वर्षांत सरासरी 39.7 टक्के रिटर्न दिला आहे. भविष्यात हा शेअर अजून तेजीत असण्याची शक्यता आहे. वर्ष 2027 पर्यंत हा शेअर 634 रुपयांवर पोहचण्याचा अंदाज आहे. तर 2028 पर्यंत 674 रुपये आणि वर्ष 2030 पर्यंत या स्टॉकचे मूल्य 776 रुपये होण्याचा अंदाज आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.