world cup 2023 | जगातील दिग्गज ब्रँडला हवी मोहम्मद शमीची साथ, ओतला पाण्यासारखा पैसा

world cup 2023 | आयसीसीच्या विश्वचषकात मोहम्मद शमी हे नाव सध्या प्रत्येकाच्या तोंडी आहे. त्याने कर्तृत्वाने, परिश्रमाने हा मैलाचा दगड रोवला आहे. खासगी आयुष्यातील वादळाशी दोन हात करता करता शमीच स्वतः एक वादळ झाला. त्याने जोरदार कामगिरी बजावली. त्याच्यावर आता जागतिक कंपन्या पण फिदा झाल्या आहेत. त्याच्यासाठी त्यांनी पायघड्या अंथरल्या आहेत.

world cup 2023 | जगातील दिग्गज ब्रँडला हवी मोहम्मद शमीची साथ, ओतला पाण्यासारखा पैसा
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 2:57 PM

नवी दिल्ली | 17 नोव्हेंबर 2023 : जेव्हा आयसीसी विश्वचषकाचा महाकुंभ भरला. त्यावेळी कोणाच्या गावी पण नव्हते की, मोहम्मद शमी हे नाव जगभर गाजेल. हा गोलंदाज भारताला अनेक कठीण प्रसंगात संकटमोचक ठरेल. हार्दिक पांड्या दुखापतीने बाजूला झाला. त्यावेळी टीम इंडियामध्ये मोहम्मद शमी केवळ एक खांदा बदल होता. मनगटाचा खुबीने वापर करत त्याने कमाल केली. कधी खासगी आयुष्याच्या वादाळात अडकलेला शमी स्वतःच एक वादळ झाला. त्याने अनेक खेळाडू तंबूत परतवले. त्याच्या या कामगिरीची दखल सर्वच क्षेत्रात घेतल्या जात आहे. अनेक दिग्गज कंपन्यांना तो त्यांच्या जाहिरातीत हवा आहे, त्यासाठी कंपन्यांनी कराराचा सपाटा लावला आहे.

जोरदार कामगिरी

या विश्वचषकात शमीने आतापर्यंत केवळ 6 सामने खेळले. 23 खेळाडूंना त्याने तंबूत परतवले. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात तर त्याने कमाल केली. त्याने एकट्याने 7 खेळाडू बाद केले. यापूर्वी हा किताब ऑस्ट्रेलियाचे एडम जँम्पा यांच्या नावावर होता. त्यांनी 10 सामन्यात 22 बळी घेतले होते. यावरुन शमी कोणत्या ताकदीचा गोलंदाज आहे हे वेगळे सांगायला नको.

हे सुद्धा वाचा

शमीसाठी पायघड्या

कोलकत्ता येथील एथलिट आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी फ्लेअर मीडियाचे संस्थापक सौरजित चॅटर्जी यांनी ईटीला याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, आरोग्य, शीतपेय, इलेक्ट्रॉनिक्स, हेडफोन आणि इतर अनेक ब्रँड, शमीला ब्रँड एंम्बेसेडर करण्यासाठी उत्सुक आहेत. लवकरच काही कंपन्यांशी त्यांचा करार होईल, असे त्यांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन आठवड्यात शमीला अनेक फोन आणि ईमेल पाठविण्यात आले आहे. अनेक प्लॅटफॉर्मवर दिग्गज कंपन्या शमीच्या प्रतिमेचा फायदा घेण्याची तयारी करत आहेत.

शुल्क झाले दुप्पट

या सर्व कामगिरीचा मोठा फायदा शमी झाला. शमीने एंडोर्समेंट फीमध्ये 100 टक्के म्हणजे दुप्पट वाढ केल्याची माहिती चॅटर्जी यांनी दिली. यापूर्वी शमी प्रति डील 40 से 50 लाख रुपये घेतल असल्याचे समोर आले आहे. आता त्यासाठी 1 कोटी रुपये अदा करावे लागणार आहे. विश्वचषकाअगोदर स्पोर्टविअर फर्म फर्म प्यूमा, हेल एनर्जी ड्रिंक आणि व्हिजन 11 या एपसोबत शमीचा करार झाला आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.