बाबो! महागाईची पुन्हा धडकी ;घाऊक किंमत निर्देशांकात मे महिन्यात वाढ
इंधन आणि खाद्यतेलानं सर्वसामान्य भारतीयाचं पुन्हा एकदा तेल काढल्याचे सिद्ध झाले. भारतीय बाजारात खाद्यतेलाचे आणि इंधनाचे दर काही अंशी कमी झाले असेल तरी मे महिन्यांत घाऊक किंमत निर्देशकांना पुन्हा एकदा उसळी घेतल्याचे समोर आले आहे.
सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसलेली महागाई काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीये. सरकारने काही पातळ्यांवर महागाई (Inflation) आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले आहेत. परंतू, हे प्रयत्न अत्यंत तोकडे आहेत. कर कपातीनंतरही इंधनाचे दर चटके देत आहेत. खाद्य तेलाचे दरानेही सर्वसामान्यांचे तेल काढले होते. गॅसच्या किंमतींमुळे तर घरगुती जेवणच महागले आहेत. या सर्व गोष्टींचा व्हायचा तो परिणाम झाला आहे. मे महिन्यात देशाच्या घाऊक किंमत निर्देशांकात(Wholesale Price Index-WPI) कमालीची वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यापेक्षा मे महिन्यांत महागाईने रेकार्ड तयार केला आहे. 15.08 असलेला निर्देशांक मे महिन्यात 15.88 टक्क्यांवर गेला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत, मे महिन्याच्या आकडेवारीवर बघितल्यास हा दर 13.11 टक्के होता. वाणिज्य मंत्रालयाने(Commerce Ministry) आता या वाढत्या दराचा जेवढा फटका सर्वसामान्यांना बसेल तेवढीच सरकारची डोकेदुखी वाढेल हे वेगळं सांगायला नको.
महागाई निर्देशांकाला हे घटक कारणीभूत
आता या घाऊक महागाई निर्देशांक वाढीला कोणत्या घटकाचे पाठबळ मिळाले ते बघुयात. सर्वात अगोदर इंधन आणि खाद्यतेल हे घटक महागाईला कारणीभूत ठरल्याचे समोर आले. यासोबतच नैसर्गिक वायू, एलपीजी गॅस, अन्नधान्य घटक, तर रोजच्या जीवनातील काही घटकांचा थेट परिणाम या घाऊक महागाईला बळ देणारा ठरला. रसायने आणि रासायनिक पदार्थांचा यात समावेश आहे. अचानक उसळलेल्या या महागाई निर्देशकांची आकडेवारी, सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनंतर समोर आली आहे. त्यात ग्राहकांचा किरकोळ किंमत निर्देशांकाने 7.04 टक्क्यांवरुन अगदी सहज 7.79 टक्क्यांवर मारलेल्या उडीची माहिती देण्यात आली होती. विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षात या निर्देशांकाचा आलेख तक्ता पहिल्यांदाच एवढा हलला होता.
निर्देशांकाची घौडदौड चिंताजनक
आकडेवारीवर नजर टाकल्यास घाऊक किंमत निर्देशांकाची ही घौडदौड निराशाजनक तर आहेच पण चिंताजनक ही आहे. खाद्य निर्देशांक तर यंदा एप्रिलच्या 8.88 टक्क्यांवरुन मे महिन्यात 10.89 टक्क्यांवर पोहचला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील वाढ ही चिंताजनक आहे. या क्षेत्रात 2.3 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. यात एकच दिलासा आहे तो, उत्पादित वस्तूंच्या किंमत निर्देशांकात केवळ 0.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.
निर्देशांकाची घौडदौड चिंताजनक
आकडेवारीवर नजर टाकल्यास घाऊक किंमत निर्देशांकाची ही घौडदौड निराशाजनक तर आहेच पण चिंताजनक ही आहे. खाद्य निर्देशांक तर यंदा एप्रिलच्या 8.88 टक्क्यांवरुन मे महिन्यात 10.89 टक्क्यांवर पोहचला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील वाढ ही चिंताजनक आहे. या क्षेत्रात 2.3 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. यात एकच दिलासा आहे तो, उत्पादित वस्तूंच्या किंमत निर्देशांकात केवळ 0.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.