Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हालाही आयकर विभागाची नोटीस आलीये? गोंधळून जाऊ नका, ‘असे’ द्या नोटीसीला उत्तर

अनेकदा कर भरून देखील आयकर विभागाची नोटीस येते. तसेच कर भरताना काही त्रुटी आढळल्यास देखील नोटीस पाठवली जाते, अशावेळी गोंधळून न जाता नोटीसीला उत्तर द्यावे.

तुम्हालाही आयकर विभागाची नोटीस आलीये? गोंधळून जाऊ नका, 'असे' द्या नोटीसीला उत्तर
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 5:30 AM

पुण्यातील एका फार्मा कंपनीत काम करणाऱ्या चंदनला आयकर विभागाची (income tax department) नोटीस मिळाली आहे. कंपनीनं वेळेवर कर (Tax) भरूनही नोटीस का आली ? याचं कारण चंदनला समजलं नाही. चंदनप्रमाणेच आयटी नोटीस (IT NOTICE) मिळाल्यावर घाबरून जाणाऱ्या करदात्यांची संख्याही मोठी आहे. तर काही लोक नोटीसकडे दुर्लक्ष करतात. मात्र तुम्ही जर या नोटीसीकडे दुर्लक्ष केले तर अडचणीत येऊ शकतात, त्यामुळे या नोटीसीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. यातील काही नोटीसींना आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइट वर ऑनलाइन उत्तर दिले जाऊ शकते. https://eportal.incometax.gov.in/iec/foservices या लिंकवर क्लिक करून तुम्ही उत्तर सबमिट करू शकता. करदात्याने अधूनमधून वेबसाइटवर लॉग इन करावं. त्यामुळे एखाद्या नोटीसला उत्तर द्यायचं बाकी आहे का? याची माहिती मिळते. तसेच लिंकमध्ये नोटीस असल्यास नोटीसचा तपशील कळतो.

आयटीआर दाखल न केल्यास नोटीस

तुमच्या बचत खात्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा आहे किंवा रिअल इस्टेट खरेदी केलीये पण ITR भरला नसल्यास आयकर विभागाची नोटीस येते. या नोटीसला तुम्ही ऑनलाईन उत्तर देऊ शकता. नोटीसचे उत्तर न दिल्यास अडचणी वाढतात. ITR दाखल केल्यानंतर आयकर कलम 143(1) नुसार नोटीस मिळते. ही नोटीस तुमच्या आयटीआरबद्दल असते.. या नोटीसमध्ये तुम्ही भरलेल्या रिटर्नचे सर्व तपशील असतात. या नोटीसमध्ये आयकर विभागाकडून तुमच्या कर मोजणीचा तपशीलही असतो. तुम्ही उल्लेख केलेला तपशील आयकर विभागाचा तपशील एकच असल्यास तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही.

…तर द्यावे लागते स्पष्टीकरण

मात्र तपशीलात फरक असल्यास तुम्हाला स्पष्टीकरण द्यावे लागते. उदाहरणार्थ, रिटर्न भरतेवेळी FD मधून मिळालेल्या व्याजाच्या उत्पन्नाचा तपशील न दिल्यास आयकर विभाग नोटीस बजावते. या नोटीसमध्ये संपूर्ण कराची रक्कम थकबाकी म्हणून दिसून येते. मग आपण काय करावे? ITR भरताना काही त्रुटी राहिल्यास तुमच्याकडून अतिरिक्त कराची मागणी करण्यात येते, असं सीए अंकित गुप्ता म्हणतात. तुम्ही नोटीसला उत्तर दिल्यास कर भरण्याचा रेकॉर्ड चांगला करू शकता. सिव्हिल पिनल कोड म्हणजेच ‘CPC’ द्वारे अपलोड केलेल्या नोटीसला वेळेत उत्तर न दिल्यास, प्रकरण सहाय्यक आयुक्तांकडे हस्तांतरित केले जाते. तुम्ही आयुक्तांना भेटल्यानंतरच प्रश्न सूटतो. कराची रक्कम निश्चित केल्यानंतर तुम्हाला तेवढा कर भरावाच लागतो.

हे सुद्धा वाचा

थकबाकीवर चक्रवाढ व्याज

अतिरिक्त कर भरणासंदर्भातील नोटीसला तुम्ही उत्तर न दिल्यास आयकर कलम 245 अंतर्गत पुन्हा नोटीस पाठवली जाते. भविष्यात मिळणारा आयकर परतावा थकबाकीत अडजेस्ट केला जाणार आहे, असं नोटीसमध्ये लिहिलेलं असतं. थकबाकीवर दर महिना दोन टक्के चक्रवाढ व्याज लागते. थकबाकीची रक्कम शून्य झाल्याशिवाय हा प्रश्न सुटत नाही.

चुकीचा आयटीआर भरल्यास काय कारवाई?

चुकीचा आयटीआर भरल्यास आयकर कलम 139 (9) अंतर्गत नोटीस पाठवण्यात येते. उदाहरणार्थ, तुमचा व्यवसाय आहे ,पण तुम्ही बॅलेन्स शीट सादर केली नाही तर आयटीआर सदोष मानला जातो. अशा परिस्थितीत तुम्हाला पुन्हा एकदा चुक दुरुस्त करून आयटीआर भरण्याची संधी मिळते. मात्र, नवीन आयटीआर 15 दिवसांच्या आत सादर करणं बंधनकारक असते. तुम्हाला आयकर विभागाची नोटीस मिळाल्यास वेळेच्या आत उत्तर दाखल करा. कोणत्या कारणांमुळे नोटीस आली आहे हे माहित नसेल तर अशावेळी सीएचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. तसेच नोटीसच्या उत्तराचा पाठपुरावा देखील करा.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.