Narayan Murthy | उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या सल्ल्यावर तरुणाई तुटून पडली, हे उलट सल्ले तर वाचा..
Narayan Murthy | इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या एका सल्ल्याने सध्या तरुणाईत प्रचंड रोष दिसून येत आहे. त्यांचा सल्ला हा भांडवलशाहीचे द्योतक असल्याचे टोमणे लागलीच सोशल मीडियाच्या माध्यमातून लगावण्यात आले. तरुणाईने या वक्तव्यावर नाराजीच व्यक्त केली नाही तर त्याचा चांगलाच समाचार घेतला. काय आहे त्यांचा सल्ला, का आहेत अनेक तरुण नाराज, त्यांचे म्हणणे तरी काय?
नवी दिल्ली | 27 ऑक्टोबर 2023 : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या सल्ल्यानंतर तरुणाई त्यावर व्यक्त होत आहे. अनेकांनी त्यांच्या सल्ल्याचा समाचार घेतला आहे. रतन टाटा, आनंद महिंद्रापासून अनेकांना तरुणाई फॉलो करते. त्यांचे ते आदर्श आहेत. पण यावेळी नारायण मूर्ती यांचा हा सल्ला त्यांच्या काही पचनी पडला नाही. भारताला महाशक्ती व्हायचे असेल, अर्थव्यवस्थेमध्ये चीनला मागे टाकायचे असेल तर तरुणांनी एका आठवड्यात किमान 70 तास काम करायला हवे, असे नारायण मूर्ती म्हणाले होते. मोहनदास पै यांच्या पॉडकास्ट ‘The Record’ मध्ये त्यांनी या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर तरुणाईने या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियात मीम्सचा पाऊस पडला.
कार्यसंस्कृतीवर दिला भर
एन आर नारायण मूर्ती यांनी तरुणाईसाठी मोलाचा सल्ला दिला. त्यांच्या मते, येत्या काही दशकांत भारताला आर्थिक क्षेत्रात मोठी भरारी घ्यायची असेल आणि इतर देशांशी स्पर्धा करायची असेल तर भारताला आपली कार्यसंस्कृती बदलावी लागेल. यासाठी तरुणांनी काम करत राहिले पाहिजे.भारताची कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी असल्याचा उल्लेख त्यांनी केला. सरकारमधील भ्रष्टाचार आणि नोकरशाहीतील दिरंगाई ही कार्य उत्पादकता घटण्याची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील तरुणांनी दर आठवड्याला 70 तास तरी काम करावे असा सल्ला त्यांनी दिला.
जपानसह जर्मनीचे उदाहरण
त्यांनी मुलाखतीत जपानसह जर्मनीचे उदाहरण दिले. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि जपान पूर्णपणे उद्धवस्त झाले होते. पण या दोन्ही देशांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेतली. त्याचं उदाहरण मूर्ती यांनी तरुणाई समोर ठेवले. या देशातील तरुणाईने तासनतास काम केले आणि जगाला कामातून उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले.
Indirectly #Infosys founder Narayana Murthy is saying..
work 12 hours per day
spoil your mental health due to NO proper sleep
after spoiling ur health,spend lakhs of rupees in hospitals for ur treatment
increase the business of Infosys
increase profit,revenue of Infosys 😁😁 pic.twitter.com/YEEVdoEoig
— Sharanu.N🇮🇳 (@sharanu_ja) October 27, 2023
For Indians — and not just India — to progress, capitalists like Narayana Murthy should help create more jobs, make better use of their corporate social responsibility funds & most importantly not exploit youngsters. pic.twitter.com/eL6wAvT7zE
— Mirza Arif Beg (@Iammirzaarif) October 26, 2023
तरुणाईला नाही रुचला सल्ला
अनेक युझर्सननी या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांना 70 तास काम करण्याची कार्यसंस्कृती काही रुचली नाही. आठवड्यातील 70 तास कामात घालवण्याबद्दल पूर्णपणे असहमत. ’70 तास काम केल्यानंतर भारत सर्वोत्तम देश होईलही, पण कोणत्या किंमतीवर?’ असा सवाल एका युझर्सने केला. फ्रेशर्सना इन्फोसिसकडून 3.5 लाख रुपये पगार दिला जातो. त्यांना आठवड्यातून 70 तास काम करावे लागते. भांडवलदार कर्मचाऱ्यांना नफा कमावून देणारी यंत्रे म्हणून पाहत असल्याचा पलटवार एका युझर्सने केला.