Pan Aadhar Card News : पॅन आधार लिंक केले नाही, मग भरा दुप्पट दंड!

Pan Aadhar Card News : आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची संधी तुम्ही गमावली आहे. आता तुम्हाला पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी दुप्पट दंड आकारला जाणार आहे. पुरेशी संधी देऊनही तुम्ही आधार कार्ड पॅनशी न जोडल्याने तुम्हाला भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

Pan Aadhar Card News : पॅन आधार लिंक केले नाही, मग भरा दुप्पट दंड!
आता दुप्पट भूर्दंडImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 6:11 PM

Pan Aadhar Link Last Date Over: आधार कार्ड सोबत पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ही तुम्ही गमावून बसला आहात. तुमचा आळस तुम्हाला नडला म्हणावा अथवा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले, जे काही असेल त्याची किंमत तुम्हाला दुप्पटीने मोजावी लागणार आहे. 30 जून ही हे दोन ओळखपत्र जोडण्याची शेवटची तारीख होती. ही अंतिम मर्यादा उलटून गेल्याने तुम्हाला जोरदार झब्बू आता सहन करावा लागणार आहे. यापू्र्वी आधारला (Aadhar card) पॅन कार्ड (Pan Card) लिंक करण्याची 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख होती. पण इंटरनेट समस्या आणि कोरोनाची कारणे देत ही अंतिम मुदत (Last Date) पुढे ढकलण्यात आली होती. 31 मार्च ते 30 जून पर्यंत आधार कार्ड पॅन सोबत जोडण्यासाठी सध्या 500 रुपये दंड वसूल करण्यात येत होता. आता 30 जून नंतर आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांना 1000 रुपये मोजावे लागणार आहेत.

मार्च महिन्यानंतर नाही मिळणार या सुविधा

प्राप्तिकर अधिनियम(Income Tax Act) चे नियम 234 H नुसार, 30 जूननंतर 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी 1,000 रुपयांचा दंड जमा करावा लागणार आहे. तोपर्यंत म्हणजेच मार्च 2023 पर्यंत तुमचे पॅनकार्ड वैध राहिल. या कारणांमुळे तुम्ही सहजच 2022-23 साठी ITR दाखल करु शकाल. मात्र त्यानंतर तुम्हाला मार्च महिन्यानंतर ही सुविधा मिळणार नाही.

हे सुद्धा वाचा

तर बसेल 10 हजारांचा दंड

वारंवार सांगूनही तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यामुळे तुम्हाला म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट अथवा बँकेतील खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक असताना ते निष्क्रिय असल्याने या सेवा मिळणार नाहीत. तसेच या बंद झालेल्या पॅनकार्ड वापर तुम्ही ओळखपत्र म्हणून करु शकणार नाही. तसा करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दंड लागणार आहे. प्राप्तिकर अधिनियम 1961 चा नियम 272 B नुसार, तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.

असा भरावा लागेल दंड

  1. पॅन आधार लिंकिंग करण्यासाठी https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp या पोर्टलला भेट द्या
  2. पॅन-आधार लिकिंगसाठी विनंती करा. Challan no/ITNS 280 वर क्लिक करा
  3. टॅक्स अॅप्लिकेशन निवडा
  4. मायनर हेड अंतर्गत सिंगल चालानमध्ये शुल्क भरण्याचा पर्याय निवडा
  5. नेटबँकिंग, डेबिट कार्ड यापैकी एक पेमेंट पद्धत निवडा
  6. पॅन क्रमांक प्रविष्ट करा, असेंसमेंट इयर निवडा आणि सविस्तर पत्ता लिहा
  7. कॅप्चा प्रविष्ट कार आणि प्रोसिड टॅबवर क्लिक करा
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.