‘या’ विद्यापीठात तब्बल 128 पदांसाठी बंपर भरती, सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी
एका नामांकित विद्यापीठामध्ये मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. सरकारी नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी नक्कीच असणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 128 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अत्यंत सोपी अशी भरती प्रक्रिया असून इच्छुकांनी लवकर अर्ज करावा.
मुंबई : प्राध्यापक पदावर काम करू इच्छित असलेल्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे तब्बल 128 पदांसाठी भरती प्रक्रिया ही पार पडणार आहे. 17 नोव्हेंबर 2023 पासून ते 7 डिसेंबर 2023 आपण अर्ज करू शकता. लखनऊ विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. लखनऊ विद्यापीठाने प्राध्यापक पदांसह इतर काही पदांसाठी भरती नोंदणी प्रक्रिया सुरू केलीये. विशेष म्हणजे लखनऊ विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट lkouniv.ac.in वर ऑनलाइन पद्धतीने आपण सहजपणे अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात नेमका कशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. विशेष म्हणजे यासाठी इच्छुकांना शुक्ल देखील भरावे लागणार आहे.
या भरती प्रक्रियेची सर्वाधिक विशेष बाब म्हणजे यामध्ये सर्वात जास्त पदे ही सहाय्यक प्राध्यापकांची आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 84 पदे ही सहाय्यक प्राध्यापकासाठी आहेत. खरोखरच ही मोठी संधी प्राध्यापकांसाठी नक्कीच असणार आहे. नेमकी कोणती पदे आहेत, याबद्दल देखील आपण सविस्तरपणे जाणून घेणारच आहोत.
सहाय्यक प्राध्यापकाची 84 पदे, प्राध्यापक 13 पदे, संचालक 2 पदे आणि सहयोगी प्राध्यापकसाठी 29 पदे असणार आहेत. यानुसार ही भरती होणार आहे. यामुळे इच्छुकांनी 17 नोव्हेंबर 2023 पासून ते 7 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करावा. भरती प्रक्रिया म्हटले की, कागदपत्रे आलीच. पुढील सहा दिवस कागदपत्रांची पुर्तता करण्याची वेळ इच्छुक उमेदवाराकडे नक्कीच आहे.
सुचनेनुसार, संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार पात्रता असणे आवश्यक आहे. याबद्दलची अधिक माहिती आपण वेबसाईटवरून घेऊ शकता. SC, ST च्या विद्यार्थ्यांसाठी 1200 रूपये फिस निश्चित करण्यात आलीये. OBC, EWS, UR या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 1500 रूपये फिस भरावी लागणार आहे.
या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे या पदांसाठी उमेदवाराची थेट मुलाखतीमधून निवड केली जाणार आहे. अर्जानुसार उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि मग त्यांची मुलाखत घेतली जाणार. या मुलाखतीमध्ये ज्यांची निवड होईल, त्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आणि मग त्या उमेदवाराची नियुक्ती केली जाईल.