Agneepath Scheme: अग्निवीर भरतीची अधिसूचना जारी, आठवी पास असाल तरीही करता येणार अर्ज! कुठे करणार अर्ज, वाचा

आज अखेर योजनेसाठी नोंदणी कधीपासून असेल हे सांगण्यात आलंय. खालील अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता.

Agneepath Scheme: अग्निवीर भरतीची अधिसूचना जारी, आठवी पास असाल तरीही करता येणार अर्ज! कुठे करणार अर्ज, वाचा
Agniveer RecruitmentImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 3:40 PM

अग्निपथ योजना लागू करण्यात आली आणि एकच गोंधळ सुरु झाला. काहींनी योजनेचं स्वागत केलं, काहींनी विरोध. लष्कराने काल पत्रकार परिषद घेऊन बऱ्याच गोष्टींचं स्पष्टीकरण दिलं. गदारोळ झाल्यानंतर बरेच बदल सुद्धा या योजनेत करण्यात आले. आज अखेर योजनेसाठी नोंदणी कधीपासून असेल हे सांगण्यात आलंय. खालील अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजने (Agneepath Scheme) अंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी भारतीय लष्कराने (Recruitment Announcement By Indian Army) अग्निवीर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. याअंतर्गत उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी (Online Registration) करणे बंधनकारक आहे. यानंतर joinindianarmy.nic.in भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. जुलै 2022 मध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.

या पदांसाठी होणार भरती

  • अग्निवीर जनरल ड्युटी
  • अग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन/ एम्युनेशन)
  • स्टोरकीपर टेक्निकल
  • अग्निवीर ट्रेड्समन 10 वी पास
  • अग्निवीर ट्रेड्समन 8 वी पास

भरती

अधिसूचनेनुसार, भरती केवळ उपलब्ध रिक्त जागांवर आधारित गुणवत्तेवर असेल. भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच लष्करात भरतीचा दावा करण्याचा अधिकार असणार आहे. तसेच आवश्यक प्रमाणपत्रे नसलेले उमेदवार स्वतः नकारास जबाबदार ठरतील, असेही नमूद करण्यात आले आहे.

वेतन

जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांची भरती 4 वर्षांसाठी केली जाणार आहे. या काळात उमेदवारांना दरवर्षी 30 दिवसांची रजाही मिळणार आहे. प्रथम वर्ष 30,000/- वेतन व भत्ते सेवा , दुसऱ्या वर्षी 33,000/- वेतन व भत्ते, तृतीय वर्षी 36,500/- वेतन व भत्ते, शेवटच्या वर्षी 40,000/- व भत्ते देण्यात येतील.

हे सुद्धा वाचा

जुलैमध्ये नोंदणीला सुरुवात

यापुढे भारतीय लष्करात भरती अग्निपथ योजनेतूनच  होणार आहे असं काल संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. अग्निपथ योजनेवरून सध्या प्रचंड गदारोळ सुरु आहे. या आंदोलनाला विरोध देखील सुरु आहेत. अशातच एक महत्त्वाची बातमी हाती येतीये. अग्निपथ योजनेला विरोध होत असतानाच यादरम्यान, भारतीय लष्कराने आवश्यक अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेनुसार, जुलैमध्ये नोंदणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.