AICTE Revised Calendar 2021 : एआयसीटीईचे सुधारीत कॅलेंडर जारी, अभियांत्रिकी महाविद्यालयांचे वर्ग 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार

सीट रद्द करण्यासाठी आणि रिफंडची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी की सर्व संस्थांना 20 ऑक्टोबरपर्यंत जागा भरायच्या आहेत.

AICTE Revised Calendar 2021 : एआयसीटीईचे सुधारीत कॅलेंडर जारी, अभियांत्रिकी महाविद्यालयांचे वर्ग 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार
एआयसीटीईचे सुधारीत कॅलेंडर जारी, अभियांत्रिकी महाविद्यालयांचे वर्ग 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 12:49 AM

AICTE Revised Calendar 2021 : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने सुधारीत शैक्षणिक कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी एआयसीटीईने जाहीर केलेल्या कॅलेंडरनुसार 1 सप्टेंबरपासून वर्ग सुरू होणार होते. नवीन कॅलेंडरनुसार अभियांत्रिकी महाविद्यालयातील वर्ग 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. तर फ्रेशर्ससाठी 25 ऑक्टोबरपासून वर्ग सुरु केले जातील. नवीन एआयसीटीई कॅलेंडरनुसार (AICTE Revised Calendar 2021) संस्थांमधील काऊंसलिंगची पहिली फेरी 30 सप्टेंबर 2021 रोजी संपणार आहे, तर दुसर्‍या फेरीचे समुपदेशन 10 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. सीट रद्द करण्यासाठी आणि रिफंडची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी की सर्व संस्थांना 20 ऑक्टोबरपर्यंत जागा भरायच्या आहेत. (AICTE’s revised calendar released, classes of engineering colleges will start from October 1)

25 ऑक्टोबरपासून फ्रेशर्ससाठी वर्ग सुरु होणार

एआयसीटीई सुधारीत शैक्षणिक कॅलेंडर 2021-22 (AICTE Revised Calendar 2021) नुसार 1 ऑक्टोबर 2021 पासून सर्व अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यमान विद्यार्थ्यांसाठी वर्ग आयोजित केले जातील. त्याचबरोबर नव्याने प्रवेश केलेल्या फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी 25 ऑक्टोबर 2021 पासून वर्ग सुरू केले जातील.

सर्वोच्च न्यायालयाकडून मान्यता

अभियांत्रिकी व तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाने शैक्षणिक कॅलेंडर (Admission in Engineering and Technical Course) विहित केले होते. या वेळापत्रकानुसार सर्व संस्थांना अभ्यासक्रम घ्यावे लागतील आणि सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यात सुधारणा करता येणार नाहीत. एआयसीटीईने जारी केलेल्या सन 2021-22 या वर्षासाठी सुधारीत शैक्षणिक कॅलेंडरला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. हे सुधारीत शैक्षणिक कॅलेंडर सर्वोच्च न्यायालयात अधिवक्ता हरीश पांडे यांनी सादर केले.

मागील वर्षी तीन वेळा कॅलेंडर सुधारीत केले

मागील वर्षात एआयसीटीईने तीन वेळा कॅलेंडर सुधारीत केले – प्रथम ऑगस्टमध्ये, नंतर ऑक्टोबरमध्ये आणि शेवटी नोव्हेंबरमध्ये. अखेर, गेल्या वर्षी वर्ग सुरू करण्याची अंतिम मुदत 1 डिसेंबर होती आणि विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत शुल्काच्या संपूर्ण परताव्यासह प्रवेश रद्द करण्याची परवानगी देण्यात आली. आता नव्या आदेशानुसार अभियांत्रिकी व तांत्रिक अभ्यासक्रमांचे वर्ग दरवर्षी 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असून रिक्त पदे 15 ऑगस्टपूर्वी महाविद्यालये / संस्थांकडून भरायच्या आहेत. (AICTE’s revised calendar released, classes of engineering colleges will start from October 1)

इतर बातम्या

साताऱ्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक गतिमान होणार, पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या सूचना

भारतातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन तुर्भेत उभारणार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.