Bank Jobs 2022: रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या, कधी, कुठे आणि कसं करायचं अप्लाय?

RBI Jobs : इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या पदांसाठी आपला अर्ज सादर करु शकतात. आरबीआयच्या ग्रेट-बी अधिकारी पदांसाठी अर्ज करणाऱ्यांना कोणत्याही एका विषयात फर्स्टक्लास उत्तीर्ण असणं, गरजेचं आहे!

Bank Jobs 2022: रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या, कधी, कुठे आणि कसं करायचं अप्लाय?
आरबीआयचा कारवाईचा बडगाImage Credit source: Newsclick
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 9:52 PM

RBI Recruitment 2022: केंद्रीय सरकारी कर्मचारी (Central Government Employee) होण्याचं स्वप्न पाहात असला, तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आरबीआय (Reserve Bank of India) अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकर भरती केली जाते आहेत. आरबीआयमध्ये केल्या जाणाऱ्या नोकर भरतीच्या (RBI Job Opening) प्रकियेला 28 मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून आरबीआयच्या वतीनं अर्जही मागवण्यास सुरुवात झाली आहे. येत्या 18 एप्रिलपर्यत आरबीआयमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येऊ शकेल. गेल्या अनेक दिवसांपासून आरबीआयमध्ये नोकरीभरतीची प्रतीक्षा अनेकांना होती. अखेर ही प्रतीक्षा आता संपली असून नोकर भरतीसाठीचे अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आरबीआयकडून अधिकारी दर्जाच्या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकूण 294 पदांसाठी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं ही भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं आपले अर्ज भरता येतील. सोबतच पात्र उमेदवार opportunities.rbi.org.in या संकेतस्थळावर जाऊन याबाबत अधिक माहिती घेऊ शकतात.

शिक्षणाची काय अट?

इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या पदांसाठी आपला अर्ज सादर करु शकतात. आरबीआयच्या ग्रेट-बी अधिकारी पदांसाठी अर्ज करणाऱ्यांना कोणत्याही एका विषयात फर्स्टक्लास उत्तीर्ण असणं, गरजेचं आहे, किंवा त्याच तोडीचं व्यावसायिक शिक्षण घेतलेलं असणंही गरजेचंय. शिक्षणाच्या अटी अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

कोणत्या पदांसाठी किती जागांची भरती?

  1. ग्रेड बी अधिकारी, ओपन कॅटेगिरी, 238 जागा
  2. ग्रेड बी अधिकारी, आर्थिक आणि निती अनुसंधान विभाग, 31 जागा
  3. ग्रेड बी अधिकारी सांख्यिकी आणि सूचना प्रबंध विभाग, 25 जागा
  4. सहायक प्रबंधक राजभाषा, 06 जागा
  5. सहाय्यक प्रबंधक, शिष्टाचार आणि सुरक्षा, 03 जागा

भरतीप्रक्रियेच्या महत्त्वपूर्ण तारखा!

  1. कधीपासून अर्ज करता येईल? – 28 मार्च, 2022
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख? – 18 एप्रिल 2022
  3. सामान्य अधिकारी पदासाठी परीक्षा (पेपर 1) : 28 मे, 2022
  4. सामान्य अधिकारी पदासाठी परीक्षा (पेपर 2) : 25 जून, 2022
  5. अधिकारी DEPR आणि DSIM (पेपर 1) : 2 जुलै, 2022
  6. अधिकारी DEPR आणि DSIM (पेपर 2) : 6 जुलै, 2022

संबंधित बातम्या :

Bank of Baroda Recruitment 2022: सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवस बाकी

MPSC Group C Admit Card: गट क वर्गासाठीचे परीक्षा प्रवेशपत्र जाहीर ; प्रवेशपत्र थेट ‘या’ लिंकवरुन करा डाऊनलोड

MPSC चा धडाका सुरुच, PSI परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, 494 उमेदवारांची यादी प्रसिद्ध

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.