AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BECIL Recruitment 2022 : बीईसीआयएलमध्ये 500 जागांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सलटंटस इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमदेवारांसाठी चांगली संधी निर्माण झालीय.

BECIL Recruitment 2022 : बीईसीआयएलमध्ये 500 जागांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड
Jobs
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 1:36 PM

BECIL Recruitment 2022 नवी दिल्ली : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सलटंटस इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमदेवारांसाठी चांगली संधी निर्माण झालीय. बीईसीआयलमध्ये पर्यवेक्षक आणि सुपरवायझर पदाच्या 500 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. बीईसीआयएलनं ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागण्यात आले आहेत. ऑल इंडिया क्वार्टर्ली इस्टॅब्लिशममेंट अंतर्गत रोजगार सर्वे आणि स्थलांतरित मजुरांचा सर्वेक्षण करण्याचं काम करावं लागणार आहे. 17 जानेवारीपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 25 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. अर्ज दाखल केल्यानंतर उमदेवारांना ईमेल द्वारे अर्ज करावे लागणार आहेत.सुरुवातीला ऑनलाईन अर्ज दाखल करताना कोणत्याही प्रकारचं शुल्क जमा करावं लागणार नाही. ज्या उमदेवारांच्या अर्जाची निवड होईल त्या उमेदावारांना शुल्क भरावं लागेल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 आणि राखीव प्रवर्गातील उमदेवारांना 350 रुपये शुल्क सादर करावं लागेल.

अर्ज सादर कसा करायचा?

स्टेप 1 : उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी अधिकृत भरती पोर्टल becil.com ला भेट द्यावी. स्टेप 2: होम पेजवरील करिअरच्या लिंकला भेट द्या. तिथे जाहिरात क्रमांक 112 या लिंकवर क्लिक करा स्टेप 3 : मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीसह नोंदणी करा. स्टेप 4 : ऑनलाईन अर्ज सादर करुन त्याची प्रिंट आऊट घ्या. . स्टेप 5 : ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर projecthr@becil.com या ईमेल आयडीवर अर्ज पाठवा

पदांचा तपशील

बीईसीआयएलकडून पर्यवेक्षक पदासाठी 350 तर सुपरवायझरच्या 150 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

मुलाखतीद्वारे निवड

बीईसीआयएलमधील पर्यवेक्षक आणि सुपरवायझर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 50 वर्षांपेक्षा कमी असावं. उमदेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. जर आवश्यकता असेल तर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

इतर बातम्या:

IOCL Recruitment 2022 : इंडियन ऑईलमध्ये अप्रेटिंसची सुवर्णसंधी, 570 जागांसाठी अर्ज करण्याचं आवाहन

Mhada Hall Ticket : म्हाडाकडून ऑनलाईन परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

झारखंडच्या तरुणाची गगनभरारी, अ‍ॅमझॉनकडून तब्बल 1.15 कोटी रुपयांचे पॅकेज; जाणून घ्या शुभम राजचा प्रेरणादायी प्रवास

BECIL Recruitment 2022 Broadcast Engineering Consultants India Limited invited 500 applications for various post check details here

भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन.