BMC Jobs : महानगरपालिकेत नोकरी करणार का ? एकूण 10 जागा, अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा, ‘या’ पदांसाठी भरती
या पदांसाठीच्या या रिक्त जागा आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. उमेदवाराचं वय 45 पेक्षा जास्त नसावं. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रं जोडावीत आणि अर्ज 6 मे 2022 पर्यंतच पाठवण्यात यावा.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुंबईमध्ये 10 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सल्लागार, बालरोगतज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, मानसोपचार तज्ञ या पदांसाठीच्या या रिक्त जागा आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. उमेदवाराचं वय 45 पेक्षा जास्त नसावं. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रं जोडावीत आणि अर्ज 6 मे 2022 पर्यंतच पाठवण्यात यावा.
अर्ज पाठवायचा पत्ता
कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यु.एन.एम) कार्यालय एफ/दक्षिण विभाग १ ला मजला रम नं. १४ डॉ. बाबासाहेब रोड परेल, यांच्या कार्यालयात.
पदांची नावं आणि उपलब्ध जागा
सल्लागार / Consultant – 03
बालरोगतज्ञ / Pediatrician – 04
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक / Public Health Manager – 01
मानसोपचार तज्ञ / Psychiatrist – 02
शैक्षणिक पात्रता
- सल्लागार / Consultant – 1) एमबीबीएस, एमडी (पीएसएम) 2) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
- बालरोगतज्ञ / Pediatrician – 1) एमबीबीएस, एमडी (बालरोग) 2) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक / Public Health Manager – 1) एमबीए हेल्थ केअर किंवा एमपीएच 2) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
- मानसोपचार तज्ञ / Psychiatrist – 1 ) एमबीबीएस, एमडी (मानसोपचारतज्ञ) 2) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
महत्त्वाचे
वयाची अट – कमाल वय 45 वर्षे
शुल्क – शुल्क नाही
वेतन – 32,000/- रुपये ते 75,000/- रुपये
नोकरी ठिकाण – मुंबई
ही जाहिरात बघा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in
इतर बातम्या :