CBSE 12th Results 2022 live: सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर!
CBSE 10th Results 2022 live in Marathi: सीबीएसईने शुक्रवारी सकाळी बारावीचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासू शकतात.
सीबीएसईने आज, शुक्रवारी सकाळी बारावीचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर (CBSE Official Website) निकाल तपासू शकतात. नुकताच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निकाल जाहीर होण्याबाबत सांगितलं होतं की, “सीबीएसईचा निकाल जाहीर होण्यास कोणताही विलंब झालेला नाही. 2 बोर्डाची टर्म परीक्षा 15 जून रोजी संपली आणि त्यानंतर तपासणीचे काम सुरू झाले. ते पुढे म्हणाले की, सीबीएसईचा निकाल (CBSE 12th Results 2022) तपासण्यासाठी 45 दिवस लागतात, आज फक्त 30 दिवस झाले आहेत. निकाल यथावकाश जाहीर होतील.” सीबीएसईने आज, सकाळी बारावीचा निकाल जाहीर केला. यावेळीही विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. 94.54% विद्यार्थिनी आणि 91.25% विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल 98.93 टक्के लागला आहे, तर केंद्रीय विद्यालयाचा (CBSE) निकाल 97.04 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात त्रिवेंद्रमने सर्व झोनमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
मूळ गुणपत्रिकेसाठी आणखी थोडी प्रतीक्षा
विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन गुणपत्रिका डाउनलोड करता येतील, पण मूळ गुणपत्रिकेसाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थी आपल्या शाळेत जाऊन गुणपत्रिका-पास प्रमाणपत्र घेऊ शकतात. याशिवाय तुम्ही डिजिलॉकर ॲप किंवा वेबसाइटवर जाऊन सीबीएसईचा निकाल, मार्कशीट पास सर्टिफिकेट आणि इतर आवश्यक कागदपत्रे डाऊनलोड करू शकता.
CBSE 12th Result 2022: निकाल कुठे तपासायचा?
- सर्वप्रथम सीबीएसईचा निकाल तपासण्यासाठी cbse.gov.in किंवा cbresults.nic या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- आता तुम्हाला सीबीएसई 12 वी रिझल्ट टर्म 2 2022 होम पेजवर दिसेल.
- निकाल लागल्यानंतर ही लिंक ॲक्टिव्ह असेल.
- आता तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख इथे लिहून काढा आणि मग लॉग इन करा.
- तुमचा निकाल तुमच्यासमोर असेल.
- निकालाची प्रिंट आउट काढून घ्या.
सीबीएसई बारावीचा निकाल 2022 डीजी लॉकरवर
- सर्वात आधी digilocker.gov.in ऑफिशिअल वेबसाईटवर जा.
- आता आधार क्रमांक आणि मागितलेली इतर माहिती सबमिट करून लॉग इन करा.
- ‘सीबीएसई 12 वी रिझल्ट 2022’ या फाइलवर क्लिक करा.
- आता मार्कशीट तुमच्या स्क्रीनवर दिसेल, आता ते तपासून डाऊनलोड करा.