CBSE 12th 10th Result 2022 Live Updates: CBSE दहावीचा निकाल जाहीर! स्कोअर कार्ड डाऊनलोड करा…

| Updated on: Jul 22, 2022 | 6:49 PM

CBSE Board 12th 10th Result 2022 date and time Live News in marathi : अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल आज, 22 जुलैला लावण्यात आलेला आहे. विद्यार्थी बऱ्याच दिवसांपासून निकालाची वाट बघत होते. 

CBSE 12th 10th Result 2022 Live Updates: CBSE दहावीचा निकाल जाहीर! स्कोअर कार्ड डाऊनलोड करा...
10 12 cbse result 2022Image Credit source: TV9 marathi

CBSE 12th 10th Result 2022 Live: अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) बारावीचा निकाल आज, 22 जुलैला लावण्यात आलेला आहे. विद्यार्थी बऱ्याच दिवसांपासून निकालाची वाट बघत होते. नुकताच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निकाल जाहीर होण्याबाबत सांगितलं होतं की, सीबीएसईचा निकाल (CBSE) जाहीर होण्यास कोणताही विलंब झालेला नाही. 2 बोर्डाची टर्म परीक्षा 15 जून रोजी संपली आणि त्यानंतर तपासणीचे काम सुरू झाले. ते पुढे म्हणाले की, सीबीएसईचा निकाल (CBSE 12th Result 2022) तपासण्यासाठी 45 दिवस लागतात, आज फक्त 30 दिवस झाले आहेत. निकाल यथावकाश जाहीर होतील. सीबीएसईने शुक्रवारी सकाळी बारावीचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासू शकतात.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Jul 2022 03:30 PM (IST)

    CBSE 10th Result 2022 Updates: एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी घसरली, पण वैयक्तिक गुणांमध्ये सुधारणा

    मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी 90% आणि 95% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, परंतु यावर्षी सीबीएसईच्या दहावीच्या निकालात एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी खूपच कमी आहे. यंदा एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.4% आहे, जी गेल्या वर्षी ही 99.04% होती.

  • 22 Jul 2022 03:11 PM (IST)

    CBSE 10th Result 2022 Live Updates: स्कोअर कार्ड डाऊनलोड करा

    अधिकृत वेबसाइट्स

  • 22 Jul 2022 03:02 PM (IST)

    CBSE 10th Result 2022 Updates: ANI या वृत्तसंस्थेने याबाबतचं ट्विट करत माहिती दिली

    मोठ्या प्रतीक्षेनंतर सीबीएसई दहावीचा निकाल लागलेला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं ट्विट करत माहिती दिलीये…

  • 22 Jul 2022 02:53 PM (IST)

    CBSE 10th Result 2022 Updates: 26 एप्रिल ते 24 मे 2022 दरम्यान होती परीक्षा

    26 एप्रिल ते 24 मे 2022 दरम्यान सीबीएसईने देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा आयोजित केली होती.

  • 22 Jul 2022 02:44 PM (IST)

    CBSE 12th 10th Result 2022 Updates: 94.40 टक्के विद्यार्थी यशस्वी!

    सीबीएसई दहावीच्या परीक्षेत 94.40 टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.

  • 22 Jul 2022 02:16 PM (IST)

    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीचा निकाल जाहीर केला

  • 22 Jul 2022 02:00 PM (IST)

    CBSE 12th Result 2022 Updates: 92.71% विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण

    सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर; 92.71% विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण

  • 22 Jul 2022 01:50 PM (IST)

    CBSE 12th Result 2022 Updates: कंपार्टमेंट परीक्षा!

    सीबीएसईच्या 12 वीच्या कंपार्टमेंट परीक्षा 23 ऑगस्टपासून सुरू होणार

  • 22 Jul 2022 01:34 PM (IST)

    CBSE 12th Result 2022 Updates: दहावीचा निकालही आजच!

    सीबीएसई दहावीचा निकालही आज जाहीर होणार आहे. काही वेळातच निकाल जाहीर होतील.

  • 22 Jul 2022 01:10 PM (IST)

    CBSE 12th Result 2022 Updates: केंद्रीय विद्यालयाचा निकाल 97.04 टक्के लागला

    जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल 98.93 टक्के लागला आहे, तर केंद्रीय विद्यालयाचा निकाल 97.04 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात त्रिवेंद्रमने सर्व झोनमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

  • 22 Jul 2022 12:36 PM (IST)

    CBSE 12th Result 2022 Updates: बुलंदशहरची तान्या सिंग देशात अव्वल!

    सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे राहणाऱ्या तान्या सिंग हिने बारावी परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. तान्या सिंग ही बुलंदशहरमधील दिल्ली पब्लिक स्कूलची (डीपीएस) विद्यार्थिनी आहे.

  • 22 Jul 2022 12:17 PM (IST)

    CBSE 10th Result 2022 Updates: दहावीचा निकाल लवकरच लागणार

    सीबीएसई दहावीचा निकालही आज जाहीर होणार आहे. काही वेळातच निकाल जाहीर होतील. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.

  • 22 Jul 2022 12:02 PM (IST)

    CBSE 12th Result 2022 Updates: सीबीएसईच्या 12 वीच्या कंपार्टमेंट परीक्षा 23 ऑगस्टपासून

    सीबीएसई 12 वी कंपार्टमेंट परीक्षा 23 ऑगस्टपासून घेण्यात येणार आहे. या आधी बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला. त्याचबरोबर दहावीचा निकालही आज लागणार आहे.

  • 22 Jul 2022 11:47 AM (IST)

    CBSE 12th Result 2022 Updates: 94.54% विद्यार्थिनी उत्तीर्ण

    यावेळीही विद्यार्थिनींनीच बाजी मारली आहे. 94.54% विद्यार्थिनी आणि 91.25% विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

  • 22 Jul 2022 11:35 AM (IST)

    CBSE 12th Result 2022 Updates: उमंग ॲपवरही मिळणार निकाल!

    सीबीएसई बोर्डाचा निकाल उमंग ॲपवरही उपलब्ध असेल. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही निकाल तपासू शकाल.

    • आपल्या फोनमध्ये ॲपल स्टोअर किंवा प्ले स्टोअरवरून उमंग ॲप डाऊनलोड करा.
    • अकाऊंट तयार करा आणि तुमच्या मोबाइल नंबरवर रजिस्टर करा.
    • होमपेजवरील ‘ऑल सर्व्हिसेस’ या सेक्शनवर क्लिक करा.
    • आता दहावीचा निकाल पाहण्यासाठी ‘सीबीएसई’चा पर्याय निवडा.
    • आपला रोल नंबर आणि आवश्यक क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा.
  • 22 Jul 2022 11:25 AM (IST)

    CBSE 12th Result 2022 Updates: उत्तीर्णतेची टक्केवारी 92.71% वर

    यावेळी सीबीएसई 12 वी च्या निकालाची उत्तीर्णतेची टक्केवारी 92.71% राहिली आहे, जी वर्ष 2020 पेक्षा चांगली आहे. त्यावेळी 88.78% विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मात्र, गेल्या वर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी 99.37 टक्के होती.

  • 22 Jul 2022 11:09 AM (IST)

    CBSE 10th Result 2022 Updates: दहावीचा निकालही आजच जाहीर होणार

    सीबीएसई दहावीचा निकालही आजच जाहीर होणार आहे. काही वेळातच निकाल जाहीर होतील. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.

  • 22 Jul 2022 10:58 AM (IST)

    CBSE 12th Result 2022 Updates: अशी मिळवा मार्कशीट

    cbseresults.nic.in निकाल जारी, अशी मिळवा मार्कशीट

  • 22 Jul 2022 10:50 AM (IST)

    CBSE 12th Result 2022 Updates: सीबीएसई बारावीचा निकाल 2022 डीजी लॉकरवर

    • सर्वात आधी digilocker.gov.in ऑफिशिअल वेबसाईटवर जा.
    • आता आधार क्रमांक आणि मागितलेली इतर माहिती सबमिट करून लॉग इन करा.
    • ‘सीबीएसई 12 वी रिझल्ट 2022’ या फाइलवर क्लिक करा.
    • आता मार्कशीट तुमच्या स्क्रीनवर दिसेल, आता ते तपासून डाऊनलोड करा.
  • 22 Jul 2022 10:36 AM (IST)

    CBSE 12th Result 2022 Live: निकाल कुठे तपासायचा?

    • सर्वप्रथम सीबीएसईचा निकाल तपासण्यासाठी cbse.gov.in किंवा cbresults.nic या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
    • आता तुम्हाला सीबीएसई 12 वी रिझल्ट टर्म 2 2022 होम पेजवर दिसेल.
    • निकाल लागल्यानंतर ही लिंक ॲक्टिव्ह असेल.
    • आता तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख इथे लिहून काढा आणि मग लॉग इन करा.
    • तुमचा निकाल तुमच्यासमोर असेल.
    • निकालाची प्रिंट आउट काढून घ्या.
  • 22 Jul 2022 10:23 AM (IST)

    CBSE 12th Result 2022 Live: बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल

    सीबीएसईने शुक्रवारी (22july) सकाळी बारावीचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासू शकतात.

Published On - Jul 22,2022 10:18 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.