CDAC Recruitment 2021: सीडॅक मुंबई येथे 111 पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्समेंट म्हणजेच सीडॅकच्या वतीनं मुंबई येथील विविध पदांसाठी पदभरती जाहीर केली आहे. पात्र उमदेवार सीडॅकच्या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात.
मुंबई : सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्समेंट म्हणजेच सीडॅकच्या वतीनं मुंबई येथील विविध पदांसाठी पदभरती जाहीर केली आहे. पात्र उमदेवार सीडॅकच्या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. प्रोजेक्ट मॅनेजर, असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट इंजिनिअर्स, सीनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर्स या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकूण 111 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 09 डिसेंबर आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी तत्वावर केली जाणार असल्याचंही सीडॅक कडून सांगण्यात आलं आहे. सीडॅक ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येते.
शैक्षणिक पात्रता:
सीडॅकमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं बी.ई.बी.टेक, एमसीए, एम.ई. एमएससी किंवा पीएच. डी. झालेलं असणं आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई येथे नोकरीसाठी रुजू व्हावे लागेल. प्रत्येक पदासाठी किमान 3 ते कमाल 9 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
अर्जाचं शुल्क
खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्जाचं शुल्क 200 रुपये सादर करावं लागणार आहे. तर. एससी, एसटी, दिव्यांग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यासंह महिला उमेदवारांना फीमधून सवलत देण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज कुठं दाखल करायचा?
सीडॅकमधील प्रोजेक्ट मॅनेजर, असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट इंजिनिअर्स, सीनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर्स या जागांसाठी अर्ज दाखल करणारे विद्यार्थी यhttps://www.cdac.in/index.aspx?id=ca_AdvtPEPM_03_2021 या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.
इतर बातम्या: